||महालक्ष्मी देवीची आरती||




This Aarti is sung to worship Goddess Lakshmi- Goddess of wealth, prosperity and good Fortune. Goddess Mahalakshmi is the wife of God Vishnu and is a symbol of wealth, prosperity.

maha 1

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापकरुपे तू स्थूलसुक्ष्मी ||धृ||

करवीरपुरवासिनी सुरवर मुनिमाता | पूरस्त्रवरदायिनी मुरहरप्रियकांता |

कमलाकारे जठरी जन्मविला धाता | सहस्त्रवदनी सुंदर न पुरे गुणगाता ||१||

मातुलिंग गदा खेटक रवी किरणी | झळके हाटक वाटी पियुषरसपाणी |

माणिक रसना सुरंगवसना मृग नयनी |शशिधर वदना राजस मदनाची जननी ||२||

ताराश्क्ती अगम्य शिवभज कां गौरी |सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी |

गायत्री निज्बिजा निगमागम सारी |प्रगटे पद्मावती नीज धर्माचारी||३||

अमृत भरीते सरिते अधदुरिते वारी |मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी ||

 वारी माया पालट प्रनीमत परिवारी |हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी ||४||

चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी |लिहिल्या असतील माते माझे निजभाळीं |

पुसोनि चरणातळीं पद्सुमनें क्षाळी |मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ||५|| जयदेव ..

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड