Shree Gajanan Maharajanchi aarti is sung to worship Sant Gajanan maharaj. Sant Gajanan Maharaj was a saint in maharashtra. His temple is situated at Shegaon, Maharashtra.
श्रीमद सद्गुरू स्वामी जयजय गणराया | आपण अवतरलासी जगी जडजीव ताराया ||धृ||
ब्रम्ह सनातन जे तू साक्षात | स्थावर जंगमि भरला तुम्ही ओतप्रोत |
तव लीलेचा लागे कवणा नच अंत | तुज वानाया नुरले शब्दही भाषेत ||जय||||१|
वरीवरी वेडेपण ते धारण जरी केले |परी सतस्वरूपा आपुल्या भक्तां दाखविले |
निर्जल गर्दाड्सी जल ते आणविले |विहग नभीचे काननि आज्ञेत वागविले||जय|| ||२||
दांभिक गोसाव्याते प्रत्यय दावून | ज्ञानीपणाचा त्याचा हरिला अभिमान |
ओंकारेश्वरी क्षेत्री साक्षात दर्शन | नर्मदेने भक्तां करविले रक्षण|| जय|| ||३||
अगाध शक्ती ऐसी तव सद्गुरू नाथा | दुस्तरशा भव सागरी तरण्या दे हाता |
वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता | दास गणूच्या ठेवा वरद करा माथा ||जय|| || ४||