आयुर्वेद आणि तुळस वाटिका




Like
Like Love Haha Wow Sad Angry
7

Tulsi is a holy plant for Hindu peoples. It is worshipped as a goddess and remain available in every Hindu Family. It is an integral part of Indian culture. In fact , we can say that Indian culture is incomplete without Tulsi. It is also called as Holy basil. Tulsi plant is important from cultural as well as scientific point of view. It is a very useful plant from health point of view due to its medicinal properties.

TULSI_LEAF

आयुर्वेदात तुळशीचे महत्व सर्वत्र अत्यंत वाढलेले आहे, हे आता सर्वांनाच माहिती असायला हवे.

जर्मनी, अमेरिका, केनडा, नार्वे, स्पेन, इटली आणि ब्राझील इ. अनेक देश आहेत जिथे तुळशीला औषधी वनस्पती म्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कडूनिंबनंतर तुळशीला तेवढेच महत्व आहे. तसेच जीवन, परंपरा व देवधर्मात ( हिंदू संस्कृतीत ) फारच महत्वाचे स्थान आहे.

प्राचीन काळापासुन हिंदू घरात तुळस नाही हे क्वचितच दिसत असेल. परंतु आता त्याच्या मोठमोठ्या वाटिका रोवण्यात आलेल्या आहेत. भगवान श्री कृष्णाची लीलाभूमी म्हणजे वृंदावन येथे तर  तुळशीचे  मोठे वृक्ष आहेत. त्यावर मुली दोराचे पाळणे टाकून झुला झुलतात.

* तुळस म्हणजे संजीवनी बुटी :

तुळशीचे रोप घराच्या अंगणात असल्यास कोणत्याही नकारात्मक ऊर्जा घरात एकदम प्रवेश करीत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. या तुळस पानात कित्येक आजार दूर करण्याची क्षमता आहे. म्हणूनच पानाच्या रसाचे नियमित सेवन करतात.

 * वास्तूदोषाचे निवारण :

अमेरिका येथे पेटेंट डिपार्टमेंट या दिवसात जास्तीत जास्त तुळशी औषधी उत्पादन प्रतीक्षारत प्राप्त करीत आहे. साधारणत: भारतीय परंपरेत तुळशीचा चहा एक औषधी उपचार म्हणून सेवन करीत आहेत. आमच्या शास्त्रात तुळस पवित्र व पूजनीय आहे. तिला देवीचा मान दिला गेलेला आहे. ज्याप्रमाणे धार्मिक, सांस्कृतिक , औषधीत तिला महत्व आहे , त्याचप्रमाणे मनोवैज्ञांनिक महत्वसुद्धा प्राप्त झाले आहेत. घरी तुळशीचे रोपटे हा वास्तूदोषाला नष्ट करितो. त्यापासुन वास्तुदोष स्वत: समाप्त होतात. कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीवर त्याचा शुभ परिणाम होतो. हा शुभाशुभ घरात प्रवेश करणाऱ्या बाधांना अडवतो, आनंदाचे व प्रसन्नतेचे आवरण घालीत असते असे म्हणणे आहेत.

तुळशीचा सुगंध :

तुळशीच्या सुगंधाने वातावरणातील आरोग्याला हानी पोचवणारे सूक्ष्म जीवजंतू आपोआपच नष्ट होतात. तसेच त्याच्या पानाच्या सेवनाने ( न चावता पाण्यासोबत सेवन ) शरीरातील रोगजंतू मरतात. तिच्या या सुगंधी वातावरणात काही काळ वावरल्याने श्वासासंबधित किती तरी बिमारीवर लाभ मिळतो. तसेच त्याच्या काढा सेवनाने ताप, सर्दी सारख्या साधारण समस्या दूर होतात. ऋतू बदलण्याच्या काळात याचा काढा घेऊन अवश्य लाभ घ्यावा. तुळशीच्या पानांच्या रसाने त्वचारोग नाहीसा होतो. तसेच ब्लड शुगर, ब्रेस्ट कैंसर आणि ओरल कैंसर यांसारखे रोग तुळशीच्या पानाच्या सेवनाने दूर होतात; आपण याचा लाभ घेऊ शकतो. हा प्रथम प्राथमिक उपचार म्हणून सतत चालू ठेवावा.

परंतु  तुळशीचा उपयोग घेताना मात्र काही औपचारीकता बाळगावी. याचे काही खास नियम आहेत. तुळशीची पाने एकादशी, रविवार तसेच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण , संध्याकाळात व रात्री तोडू नयेत. हा एक प्रकारे दोष आहे.

तुळशीचे हिरवे झाड अंगणात अतिशय फायदेशीर आहेत. त्याने वातावरण प्रसन्न राहते तसेच परिसरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविते , पवित्रता जाणविते आणि  घरात लक्ष्मीचा वास असतो. काही समस्या असल्यास, तुळशीचे रोपटे काढावयाचे असल्यास त्याच्या दुसऱ्या ठिकाणी उपयोग करावा; काढून कुठेही फेकू नये. घरात लावलेले तुळशीचे झाड जर वाळले असेल तर ते ठेवू नये. त्याला काढून कुठल्याही शुध्द पाण्यात वाहवून घ्यावे. तुळशीचे  वाळलेले रोप अशुभ लक्षण दर्शवितो म्हणून काढून घ्यावे व लगेच त्या ठिकाणी दुसरा लावावा.

तुळशीचे पान खातेवेळी चावू नये ते पाण्यासोबत गिळून घ्यावे कारण त्यात पारा हे धातू तत्व असते, ते दाताला हानीकारक असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
7




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu