| | आदिशक्ती देवीची आरती ||




This Aarti is sung for Adishaktimata- The supreme goddess among all other Gods. According to Hindu mythology, AdiShakti—the Goddess, Devi—is the Supreme Being. According to Purana’s,  Adishakti is the original creator, observer and destroyer of the whole universe. This Arti is sung to please this supreme goddess.

divine-mother-adi-parashakti

ओम नमो आद्यरुपे देवी भगवतीमाते | कालिका कामरूप शक्ती तुं जगन्माते ||

वैष्णवी भूतमात्रा मूळपीठ देवते | झालीया भेटी तुझी निवारिसी पापातें ||१||

जयजय श्रीकुलदेवते महालक्ष्मी मातें ||आरती घेउनिया ओंवाळींन मी तूतें ||धृ||

अंबिका भद्रकाली देवी आद्या कुमारी | मारिले चंडमुंड महिषासुर हे वैरी ||

 हर्षले देवद्विज गाती जयजयकारी|| उजळूनी दीपमाला ओंवाळीती नरनारी ||२||

परिधान हेमवर्ण कंठी नवरत्ने हारं|| करतळे रातोत्पळे अदभुत जयजयकार ||

अवतार कोल्हापुरी केला प्रताप थोर | मारिलें दैत्य बिकट अघट कोल्हासूर ||३||

नासिकीं मुक्ताफळ रत्नकुंडलें श्रवणीं | घवघवीत नुपुरें हो अंदु वाजती चरणीं ||

मस्तकी पुष्पहार दिसे भासे वदनीं || पौर्णिमाचंद्रबिंब पृष्ठीवरी रुळें वेणी || ४||

नवकोटी कात्यायनी चतु:षष्टी योगिनी | भुचरां चरचरां आई तुजपासुनी ||

एसी तू महालक्ष्मी जगतांची जननी || नामया विष्णूदासा तुझें चिंतन ध्यानीं|| ५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड