Dry Paneer Chilli Roll is a food recipe, which can be served as a starter, appetizer, snack. this delicious, spicy snack is prepared by deep-frying paneer cubes. It uses variety of Indian spices and combination of corn-Flour. Below is a recipe to make this delicious, tongue-tickling tasty paneer rolls.
साहित्य –
१०० ग्राम पनीर, कॉर्नफ्लोअर, चार चमचे, बारीक चिरलेली १ सिमला मिरची, कांदा १ बारीक चिरून,सोयासॉस अर्धी वाटी, व्हिनेगर ५ चमचे, अजिनोमोटो १चमचा, मीठ ३ चमचे, ओल्या कांद्याची चिरलेली पात, कोथिंबीर अर्धी वाटी, बारीक चिरलेल्या चार मिरच्या, बारीक चिरलेला लसून अर्धी वाटी, आले लसून पेस्ट दोन चमचे, तेल ३ वाट्या, मैदा १ वाटी, सोबत शेजवान चटणी.
कृती -:
1) पनीरचे दहा ते बारा तुकडे करावे. ते भिजवलेल्या कॉर्नफ्लोवर मध्ये घोळवून मंद आचेवर तळून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
2) मैद्यात अर्धी वाटी तापलेले तेल, निम्मी कोथिंबीर, थोड्या चिरलेल्या मिरच्या, दोन चमचे सोयासॉस, व्हिनेगर दोन चमचे, आले-लसून पेस्ट एक चमचा, चवीनुसार मीठ, दोन चमचे साखर हे सर्व थोड्या पाण्यात घट्ट भिजवून घ्या. थोडावेळ तसेच ठेवा.
3) एका नॉनस्टिक कढइत पाच चमचे तेल घेऊन ते तापवा,त्यात बारीक कापलेले लसून घाला व परता, नंतर त्यात सोयासॉस, व्हिनेगर, अजिनोमोटो, कांद्याची पात , सिमला मिरची घालून परता.
4) त्यात चिरलेले पनीर घाला व कोरडे होईस्तोवर परता व थंड होवू द्या.
5) तळणासाठी तेल तापवून भिजविलेल्या पिठाची लाटी करून चौकोनी लाटा व तिच्या मध्यभागी चिली पनीरचे सारण भरा व त्याचा रोल करा. कडा दाबून घ्या. नंतर मंद आचेवर याप्रकारे सर्व तळून घ्या.
6) शेजवान चटणीसोबत सर्व करा.