Arjun is one of the greatest warriors in our all time great epic Mahabharata. Here is the story of war between Arjuna and Lord shiva is depicted in Dnyaaneshwari. Lord Shiva took the form of a a Kirāta, a wild mountaineer and faught with Arjuna to test him. During the fight, Arjuna recognized him and pleased him. Lord Shiva pleased with his bravery, gives him the powerful weapon, the Pashupatastra, which later in the Mahabharata aids him against Karna and the Kauravas during the Kurukshetra war.
जसे संग्राम हरू जिंकिला । निवांतकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहे कवळीला । क्षणामाजी ।।
अर्थ ( कथारूपांत) :- निवांतकवच हा पुलोमा व कालका यांचा पुत्र पाताळात रहात असत, संख्येने हे साठ हजार होते. वनवासात असताना पाशुपतास्त्र प्राप्तीकरीता इंद्रकील पर्वतावर अर्जुनाने शंकराची आराधना केली. अर्जुनाची परीक्षा पाहण्याकरीता मूकदैत्याच्या सहाय्याने शंकराने वेशांतर करून वराहरुपी मुकदैत्याचा पाठलाग करीत अर्जुन तपश्चर्येत बसला होता तेथें आले. त्यांच्या गडबडीने अर्जुनाच्या तपश्चर्येचा भंग झाला, म्हणून अर्जुनाने त्या वराहरुपी दैत्यास ठार केले; किरातरूपी शंकर व अर्जुन यांच्यात वराहाच्या शिकारी संबंधाने युद्ध झाले. आपल्या शौर्याने अर्जुनाने किरातरूपी शंकरास प्रसंन्न केले व शंकरांनी त्यास आपले पाशुपतास्त्र दिले. त्या अस्त्राच्या जोरावर बलाढय व महामायावी निवांतकवचाचा अर्जुनाने युद्धांत नाश केला.
( अशाप्रकारचा तू महापराक्रमी असतां, अर्जुना! या धर्म्य युद्धापासून पराड्मुख होणें तुला योग्य नाही, असे महाराज सांगतात.)