||सो$हं मंत्र||(भाग ३ )
Like
Like Love Haha Wow Sad Angry

So’ham is a natural Sadhana, a natural yoga. It is known as ajapa-japa, the unrepeated mantra repetition. Since So’ham goes on within you all the time, you do not have to make an effort to repeat it. All you have to do is become aware of it. You do not need any faith. You just have to watch the space of truth.

Soham Mantra

सो$हं हा मंत्र विश्वतारक आहे. याच्या अखंड स्मरणाने सामर्थ्य प्राप्त होते, दिव्य तेजाचे प्रादुर्भाव आपल्यात होतात; आणि जरी दिव्यानुभव लवकर अनुभवास न आल्यास उतावळे होऊ नका. जसे पाण्यातील तापमान वाढण्यास उशीर लागतो पण १०० डिग्री उष्णता झाली कि पाण्यास उकळी फुटणारच; त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे. तो आपल्यात आत्माराम रूपाने अखंड विराजमान आहेच.

इतर मंत्रात व या सो$हं मंत्रात महदंतर आहे. सो$हं हे नाम कोठेही घ्या, कोणीही घ्या, केव्हांही घ्या, कसेही घ्या, पूजेच्या वेळी किंवा अवेळी कधीही घेता येते, समजून घ्या किंवा न समजून घ्या. हे शेतात पडलेल्या उलट्यासुलट्या बिजाप्रमाणे केंव्हा तरी फलद्रूप होणारच. सो$हं नाम घेणारा पावन बनूनच त्याचा निश्चित उद्धार होतो. सो$हं नामाचा महिमा अपरंपार आहे. सो$हं नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ‘आचारहिनं न पुनन्ति वेदां:’ आचारभ्रष्ट, पतीत स्त्री-पुरुषांना वेद मुळीच पावन करू शकत नाही. परंतु सो$हं नामाने दुराचारी, व्यभिचारी असंख्य पापी स्त्री-पुरुष परम पावन होऊन विश्ववंद्य व प्रात:स्मरणीय बनलेत. घोरातीघोर, महापतीत स्त्री-पुरुषांना  परमपावन बनविणारे सो$हं नामासारखे महातीर्थ  त्रैलोक्यात दुसरे कोणतेच नाही.

स्वत: श्री उमापती शंकराने महासती पार्वतीला ‘सो$हं’ या बीज मंत्राचा उपदेश ‘समाधीस्थितप्रत’ दिला. ते म्हणतात, हे रमे ! मनोरमे ! सो$हं नामाने अवर्णनीय असा परमानंद प्राप्त होतो. ईश्वराची अनंत नामे आहेत, त्यात हे अग्रगण्य आहे. ‘सो$हं परं ज्योतिर्मय’ साक्षात सूर्य आहे. सो$हं ज्योर्तीस्वरूप प्रत्यक्ष शिव आहे. सो$हं आत्मज्योर्तीयुक्त वीर्यरूप अर्थात जीवात्मारूप परब्रम्ह आहे. ‘सो$हं-तो मीच’ प्रत्यक्ष सर्व ज्योतींची महाज्योत आहे असे प्रत्यक्ष उपनिषदवचन आहें. हा एक आदर्श महामंत्र असून, सर्वांच्या हृदयात रमणारा, दिव्य सामर्थ्य व नादमाधुर्य असलेला, असा भावार्थ आहे. हा एक तारक मंत्र आहे. संत कबीर म्हणतात याच नामाने ध्रुव,  प्रल्हाद तरले. तसेच संसाररूपी सागरातून तारणारा हा मंत्र सर्वांनाच तारून नेतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu