||सो$हं मंत्र||
Like
Like Love Haha Wow Sad Angry

The Soham mantra is a natural mantra because it is already part of your nature. Sooooo… is the sound of inhalation, and is remembered in the mind along with that inhalation. Hummmm… is the sound of exhalation, and is remembered in the mind along with that exhalation.

Soham Mantra

सो$हं या मंत्राचे महत्व अपरंपार आहे. सो$हं( स:अहं) व याचाच उलट उच्चार( अहंस:) हंस हे दोन्ही मंत्र अहंब्रम्हास्मि महावाक्याचे स्पष्ट बोधक आहेत. न करताही सो$हं हा जप अखंड श्वासोच्छवासाद्वारे होतो.

                                     सो$हं चिन्मात्रमेवैती चिंतन ध्यानं मुच्च्यते |

                                     ध्यानस्य विस्मृती: सम्यक समाधिरभिधीयते||

सो$हं अर्थात ‘तो चिन्मय सर्व समर्थ परमात्मा मीच आहे’. अर्थात ‘अहंब्रम्हास्मि’  हे चिंतन म्हणजेच ‘स्व-रूप ध्यान’! आणि ध्यान म्हणजे विषय विस्मृती व विषय विस्मृती म्हणजेच समाधी होय. (याज्ञवक्ल्य) समाधी म्हणजे जीव-शिव यांची समतावस्था संयोग किंवा योग असे म्हणतात.  सो$हं चे खरे मर्म जाणणारे  साधू, संत, महंतभक्त, योगीजन एका स्वराने सो$$$$$ हं म्हणतात. सो$हं हा मंत्र सदासर्वदा श्वासोच्छवासरूपाने अखंड जपत असतो.

                                    षटशतानि दिवा रात्रौ सहस्त्राण्येक्य विशन्ति ||

                                    एतत्संख्यान्वितं मंत्र जीवो जप्ती सर्वदा |

                                   अजपा नाम गायत्री योगियां मोक्षदा सदा||

निरोगी स्थितीत हा जप स्वभावत: २१६०० संख्येपर्यंत होतो. त्याला योगीजन मोक्ष देणारी ‘अजपा गायत्री’ असे म्हणतात. आपल्या नाकातून अहर्निश चालणाऱ्या श्वासोच्छवासाचा सूक्ष्मपणे कानोसा घेतल्यास ‘ सो$हं सो$हं ‘ असा स्पष्ट उच्चार ऐकू येतो. ‘अजपाजप’ (मुखाने न उच्चारता होणारा जप ) अशी संज्ञा आहे. या अजपाजपात प्रत्येक श्वास आत घेताना व बाहेर सोडताना ‘नादाणुसंधान’ विशेषत: ” आत्मानुसंधान” ठेवणे सर्वथैव आवश्यक आहे . ‘अहं’ किंवा ‘हं’ शब्दाने मिथ्या देहहंकार बाहेर त्यागावयाचा असतो आणि ‘स:’ शब्दाने ‘मी’ साक्षात तोच परब्रम्ह आहे! अर्थात ‘अहंब्रम्हास्मि’ असा सत्य स्वात्माहंकार आंत भ्राव्याचा असतो. अशा अखंड दृढ भावनेने नादाणुसंधानयुक्त पूर्ण आत्मानुसंधान करीत गेल्यास लवकरच चित्ताचा लाभ होऊन ते चित्स्वरुप बनते, आत्मस्वरुपाकार बनते;  भावसमाधीत जाऊन ते आत्मसाक्षात्कार बनते. असा अजपाजप हा अनेक योग्यांचा स्वानुभव आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu