|| सो$हं मंत्र || ( भाग २ )




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

“Soham” means “He I am” or “I am He”, “I am Brahma”. “Sah” means “He”, “Aham” means “I”. This is the greatest of all Mantras. This is the Mantra of Paramahamsa Sannyasis. This is an Abheda-Bodha-Vakya which signifies the identity of Jiva or the individual soul and Brahman, the Supreme Self. This Mantra comes in the Isavasya Upanishad: “Sohamasmi”

Soham Mantra

सो$हं मन्त्रोच्चारनाभ्यास, नादाणुसंधान व आत्मानुसंधान केल्यास लवकरच आपणात अदभूत  परिवर्तन होऊन दैवी चमत्कार (दैवीशक्ती) प्रत्यक्ष अनुभवास येईल. सतत अभ्यासाने सत्पुरुष बनून निश्चित जीवन्मुक्त होऊ शकतो, यात संदेह नाही. असा हा सो$हं मंत्र महानात महान विलक्षण प्रभावशाली मंत्र आहे. सो$हं साक्षात ‘आत्मब्रम्ह’ आहे. हे प्रत्यक्ष ब्रम्हबीज व विश्वबीज आहे. सो$हं यातच सर्वकाही स्थित आहे. याची उपासना म्हणजे संपूर्ण विश्वाची व देवीदेवतांची उपासना होय. या मंत्रराज सो$हं च्या उच्चारणाने दैवी शक्तीचा उदय होतो आणि मन समाधीस्थितीपर्यंत जाऊन ब्रम्हदर्शनाचे विलक्षण चमत्कार दृष्टीस पडतात असा प्रत्यक्षानुभव आहे.

या बीजमंत्राचे नितांत स्मरण केल्यास जोर्तीब्रम्ह दर्शनाचा लाभ होतो. यालाच प्रणव, अजपाजप असे म्हणतात. हा प्रत्यक्ष आत्माच असल्यामुळे तो श्वासोच्छवासात अहर्निश भरलेला आहे. प्रत्यक्ष प्रारंभसूचक असल्यामुळे यास प्रणव असे संबोधले आहे, संत, ऋषी, मुनी, योगी, भक्त सर्वांनीच सो$हं चे अपरंपार वर्णन केलेले आहे. याच्या सतत स्मरणाने कुंडलिनी नामक सर्पाकार ”चित्शक्ती” जागृत होऊन डुलू लागते आणि त्यामुळे शरीरात विलक्षण चमत्कार आपोआपच होऊ लागतात. संपूर्ण शरीरात स्पंदन ( व्हायब्रेशन ) होवून शरीर थरथर कापू लागते व रोमांचित होते; घाम सुटून शरीरात व मनात विलक्षण सामर्थ्य प्रगट होते आणि नंतर मुखाद्वारे आपोआपच प्रासादिक काव्य  बाहेर पडू लागते, दिव्यवाणी मुखातून स्त्रवू लागते, मनात परम आनंद, शांती, सौख्य प्रगट होते, मुखावर प्रचंड तेज व प्रसन्नता दिसू लागते आणि अशी अनेक दिव्य लक्षणे त्या व्यक्तीत प्रगटतात व अनुभवास येतात. तो त्यांच्या परमभाग्याचा अरुणोदय जाणावा. हीच ईश्वरी कृपा जाणावी. यामुळे तो पुढेपुढे साक्षात ज्योतिर्ब्रह्म व तेजोर्ब्रह्म बनतो.

प्रत्येक देवांचा मंत्र  वेगवेगळा असतो, परंतु  ‘सो$हं’  हा महाबीज मंत्र आहे. याने सर्वच देवीदेवता संतुष्ट, प्रसन्न होतात. हा जपयुक्त ध्यानयोगश्रेष्ठ, श्रेष्ठातीश्रेष्ठ महायोग आहे. याच्या स्मरणाने विघ्नाची शांती होते, कार्यसिद्धी व सामर्थ्य सिद्धी होते, भूत-प्रेत-पिशाचादिकाचा नाश होतो. सो$हं च्या उच्चाराने शरीरात वायूलहरी उसळतात, नाद दुमदुमतात,चित्तातील मलविक्षेपादी नाहीसे होऊन हृदयात परमशांती, प्रसन्नता, उत्साह, सामर्थ्य व दिव्यतेज यांचा प्रादुर्भाव होतो. या साधकाला सेवेत  अष्टसिद्धी अखंड तत्पर राहतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा