ज्ञानरूपी गंगा – गीता
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

The Bhagavad- Gita is considered by eastern and western scholars alike to be among the greatest spiritual books the world has ever known. In a very clear and wonderful way the Supreme Lord Krishna describes the science of self-realization and the exact process by which a human being can establish their eternal relationship with God. In terms of pure, spiritual knowledge the Bhagavad- Gita is incomparable.

Bhagvadgeeta

कलियुगात भगवान श्रीकृष्ण हेच दैवत आपल्या सर्व भक्तांचे रक्षण करणारे असे आहे. पांडवांच्या काळातही स्वत:  त्यांचेसाठी घोर कलीयुगच सुरु होते.

भगवान श्रीकृष्णाने गीतेतून सांगितले आहे कि “मीच परम पुरूषोत्तम भगवंत आहे, माझीच उपासना करा”, कारण “कृष्णस्तु भगवान” हे त्याचेच वचन आहे. भगवतगीता व त्यातील योगपद्धती सर्व प्रथम सूर्यदेवाला सांगितल्या. सूर्यदेवांनी ती मनुला सांगितली, मनूने ती नंतर अष्टवक्राला सांगितली. अशा गुरुपरंपरेतून आलेली ही गीता मध्यन्तरीच्या काळात ही परंपरा खंडीत झाल्यामुळे पुन्हा आपला पहिला मानवी शिष्य  अर्जुन याला श्रीकृष्णाने युद्धभूमीवर सांगितली.

मनुष्याचा भगवंताशी असलेला संबंध पुन्हा भक्तीमार्गातून जोडला जावा व प्रत्येकानेच मुळ परमतत्वाशी विलीन व्हावे, हा उदात्त हेतू ठेवत श्रीकृष्णांनी गीता ५०००  वर्षांपूर्वी  मानवाच्या हाती दिली. ते सांगतात कि “प्रत्येक जीव ब्रम्ह आहे तर परम पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्ण परब्रम्ह आहेत.” यालाच अध्यात्मात ‘पिंडी ते ब्रम्हांडी व ब्रम्हांडी ते पिंडी’ असे म्हटले आहे. कारण संपूर्ण प्रकृतीचा नियंता भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुनाचे अज्ञान दूर करण्यासाठी गीतेचा ज्ञानप्रकाश प्रसवला आहे. अर्जुन सर्वांग शरणागती पत्करून श्रीकृष्णाला अनन्यभावे नतमस्तक झाल्यांनंतरच गीता सांगितल्या गेली.

गीता हा भगवंताचा मंत्ररूप, शब्दरूप, ध्वनिरूप अवतार आहे. ज्ञानाच्या पराभवातुनच प्रत्यक्ष भगवंत कार्यरत होवून तिन्ही लोकांचे (स्वर्ग, मृत्यू, पाताळ) पालन पोषण करतो. हेच गीतेच्या ज्ञानातील रहस्य! गीता ही ब्रम्हस्वरूपाची श्रेष्ठतम अशी विद्या असून तिचा प्रभाव कधीही न संपणारा असाच आहे. कलीयुगासाठी ‘गीता’ हा ग्रंथ वरदान आहे. परमानंदाचे प्रवाही तत्वज्ञान गीतेत असल्यानेच वाचणारा हा आनंद प्राप्त केल्याशिवाय राहूच शकत नाही. पृथ्वीवरील मानवाच्या उत्कर्षासाठीचे आध्यात्मिक व व्यावहारिक व्यवस्थापन करणारे एकमेव साधन म्हणजेच गीतेचे वाचन, चिंतन व मनन होय. म्हणूनच भारताबाहेरील अनेक देश आपापल्या विदयापिठातून या ग्रंथाचा अभ्यास करीत आहेत. अमेरिकेतील विद्वान, उच्चशिक्षित तरुण-तरुणी, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, बुद्धिवादी विचारवंत गीतेच्या सखोल अध्ययनाच्या मागे लागलेले आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu