पराभक्ती

Like Like Love Haha Wow Sad Angry Para-bhakti is not merely intensified Bhakti. It begins where Bhakti ends. At the...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Para-bhakti is not merely intensified Bhakti. It begins where Bhakti ends. At the stage of Para-bhakti, devotion is not only single-minded, but is accompanied by extreme restlessness of the heart and a ceaseless longing to unite with the Beloved.

This is followed by lack of interest in one’s own body and its care, isolation from one’s own surroundings and utter disregard for appearances or criticism, while the divine impulses of attraction to the Beloved become more frequent.

parabhakti

सो$हं भावउपासना हीच पराभक्ती होय. सो$हं बोधाच्या चिंतनात मन-बुद्धीचे ऐक्य होऊन जीवात्म्याला शिवात्म्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त होते.

 सो$हं या मंत्रात ‘स:’ आणि ‘अहं’ अशी दोन पदे आहेंत, अहं ने देहाला अगदी घटत आणि शेवटी गट्ट केलें आहें. त्यांतून त्याला सोडवून ‘स:’ या पदात मिळवून टाकण्याचा अभ्यास साधक करू लागला म्हणजे मन हळूहळू इतर कोणत्याही कल्पनांत न रमता ‘सो$हं ‘ मंत्रात रंगू लागते. ‘मी’ शरीर नसून ‘मी’ परमात्मा आहे, असा  बुद्धीचा वारंवार निश्चय होतो. मग नंतर कालांतराने ‘मी’ शरीर नव्हे; शरीरापासून होणारी सुख-दु:खे ही माझी नव्हेत! या जाणीवेने साधक विषयसुखापासून पराड.मुख होऊन आपल्या सो$हं ब्रम्हस्वरूपांत-आनंद स्वरूपांत स्थिर होऊ लागतो. देहाची व इतर ममत्वजन्य इतर सर्व दु:खे त्याला व्याकुळ करू शकत नाही. साधकाला असा दीर्घ अनुभव येऊ लागतो.

जसजसे अनुभव वाढू लागतात, तसतसे साधकांचे अंर्तबाह्य स्वरूप ही पालटू लागते. पाप-पुण्य, चांगले-वाईट या द्वंद्वातून सुटून देहाकडे व जगत व्यवहाराकडे तो अलिप्तपणे राहू व पाहू लागतो. अशा निरंतर सो$हं ब्रम्हबोधाच्या स्मरणाने सो$हं मंत्राला जडून राहिल्याने ‘अहं’ जावून ‘स:’च आहें म्हणजे ‘मी’ परमात्माच आहें, असा सुखद अनुभव साधकास येतो. आणि या स्थितीत मन हे तत्वच मुळी शिल्लक उरत नाही.  हीच  ‘उन्मनी अवस्था’ होय. ‘मी परमात्मा आहें, सर्व परमात्मा आहें’ हा बुद्धीचा निश्चय अढळ होऊन बुद्धीतत्वहीं आत्म्यांत विराम पावून साधक अद्वयानंद सो$हं ब्रम्ह स्वरुपाकार होतो.

 || सागरी गंगा जैसी | बुद्धी आत्मीं मीनल्या तैसी ||

       मग अद्वयानंदाची | आपैसी खाणी उघडे ||

या ज्ञानदेवांच्या लाक्षणिक शब्दांवरून लक्षात येईल कि ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान-साध्य, साधक आणि साधन ह्या सगळ्या त्रिपुटींच्या पलीकडचा आत्मानंद सो$हं जोर्तिब्रम्ह स्वरूपानंदात सहज आणि सदोदित साधक नांदतो. हे सर्व सो$हं महा मंत्र स्मरणानेच लाभते. म्हणून म्हणतात

  ”ऊर्ध्वमुखे आळविला । सो$हं  शब्दाचा नाद” ( संत तुकाराम )

 सो$हं जपाचा अभ्यास पक्कदशेस आला म्हणजे  जीवदशा, जगत, जन्म-मृत्यू , सुख-दु:खे ‘मी’ आणि ‘माझे’ या सर्व कल्पना मावळून फक्त ‘स:हं’ म्हणजे आपला उपास्य, देव-दैवत!

सो$हं आत्मा हाच भाव सर्व काळ भरून साधक परमोच्च बोधाचा ‘धनी’ होतो.

सो$हं भावे हि कृतार्थता आपणास प्राप्त झाली म्हणजे भजन, पूजन, नामस्मरण,परमेश्वर गुणवर्णन, लिलावर्णन अशा स्वरूपांची भक्ती म्हणजे हा सर्व  सो$हं भाव, हीच अखंड-समाधी होय. देव, ऋषी, संत-महंत, साधू-साधक पारंगत होऊन त्यातच रममाण झालेत!

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories