ज्योर्तिब्रम्ह




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The brahma-jyoti is an inconceivably bright light. Therefore those two kinds of liberated souls who enter it are completely blinded so that they can see neither themselves nor each other. this is the experience of impersonal merging. While merged in this way, they are free from the unpleasantries of material life, and so experience a kind of spiritual satisfaction called brahmananda.

JyotiBramha

भगवान ज्योतिरूप  आहे. हृदयरूपी दर्पणांत मनाने अवलोकन केलें असतां सो$हं ज्योतिर्ब्रम्हाचे रूप दिसू लागते. हृद्य म्हणजे सहस्त्रदल होय. हें सहस्त्रदल ब्रम्हांडात टाळूस्थानी आहे.

पिंडामध्ये तळपायापासून गुडघ्यापर्यंत पृथ्वीस्थान आहें. गुडघ्यापासून नाभीस्थलापर्यंत जलाचे स्थान आहें. नाभीपासून पिंडातील हृदयापर्यंत (वक्षस्थानाचे मध्यापर्यंत) अग्नीस्थान आहें. पिंडातील हृदयापासून भृकुटी प्रांतापर्यंत वायूस्थान आहें. भृकुटी प्रांतापासून ते सहस्त्रदलापर्यंत आकाशस्थान आहें. असे हे सर्वव्यापी सहस्त्रदल रक्तवर्ण, श्वेतवर्ण, पीतवर्ण, कृष्णवर्ण असून व निळ-सुनिळ वर्णांनी सुशोभित चक्राकार (वर्तुळाकार) वलयांकृती, दिव्य-भव्य तेजोमय असें प्रकाशमय असून त्याच्या मध्यभागी ‘ज्योतीस्वरूप’ सो$हं परमात्मा आहें. म्हणजेच ‘आत्मज्योत’ अनंतकोटी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान, तेजपुंज व अनंतकोटी चंद्रासारखी अतिशय शीतल अशी आहें.

ती सो$हं ब्रम्हज्योत (आत्मज्योत, जीवनज्योत) या संपूर्ण विश्वाला आतून बाहेरून व्यापून आहें. या सो$हं ज्योतीच्या दर्शनाने मानव ज्योतीस्वरूप होऊन जीवनमुक्त होतो. तेव्हा हे मानवा सावध हो! चौऱ्यांशी लक्ष जीवंयोनीतून फिरतां फिरतां तुला हा अनमोल असा मानव जन्म लाभला आहें! तरी तू सो$हं ज्योर्तीब्रम्ह स्वरूपास जाणून मुक्त हो! !  न जाणल्यास पुन: पुन: त्या अनेक चौऱ्यांशी लक्ष योनीच्या भवचक्रांत तू सापडशील !!!

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu