उपनिषदातील महत्वपूर्ण शांती मंत्र




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Shanti Mantras or “Peace Mantras” are Hindu prayers for Peace (Shanti) from the Vedas. Generally they are recited at the beginning and end of religious rituals and discourses.

Shanti Mantras are found in Upanishads, where they are invoked in the beginning of some topics of Upanishads. They are supposed to calm the mind of the reciter and environment around him/her. Reciting them is also believed to be removing any obstacles for the task being started.

                 om

“ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते।।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते।।
ओम शांती:। शांती:। शांती:। “

ओम हे पूर्ण आहे आणि हेही पूर्णच आहे कारण पुर्णातुनच पूर्णाची उत्पत्ती शक्य आहे. प्रलयकाळी पूर्णातच पूर्ण विलय होऊन पूर्णच शिल्लक राहते.

                                              ||ओम शांती: शांती: शांती:||

ब्रम्हाच्या पूर्णतेची किती सरळ, सुंदर स्वरूपात केलेले हे वर्णन; ते पूर्ण आहे अर्थातच हे ब्रम्ह पूर्ण आहे व हे पूर्ण आहे म्हणजेच पूर्णापासून पूर्णच जन्माला आले आहे. प्रलयकाळात हा जीवात्मा हे मायामय विश्व परत परमात्म्यात विलीन होणार आहे असा हा एका पुर्णत्वापासून दुसऱ्या पुर्णत्वापर्यन्तचा प्रवास व पूर्णत्वाची येणारी प्रचीती जी ”ओम” शब्दातून व्यक्त होते व शांततेत विलीन होते. या शांती मंत्रातून प्रत्ययास येणारा अर्थ प्रत्येक श्लोकामध्ये निनादत राहतो.

 ईश्वराने ” ओम ” या शब्दानेच संपूर्ण जग आच्छादून टाकलेले आहे.

‘जगत’ किती समर्पक शब्द आहे. जे जात आहे ते जगत; जे बदलत आहे ते जगत; जे हातातून रोज निसटत आहे ते जगत. त्याचा हा स्वभावच आहे कि बदलत राहणे. आता बघा, आपले हे शरीर जन्मापासून किती बदलते, बालपण, तारुण्य, वयस्क व वार्धक्य!  तसेच निसर्ग किती बदलत राहतो, कधी कधी एका क्षणात तो त्याचे स्वरूप पालटतो. तसेच आपले आचार-विचार, देश-प्रदेश, धर्म, पृथ्वी हे अनंत ब्रम्हांड रोज बदलत असते. कधी कधी हे विनाशाकडे एक एक पाऊल टाकत असते. आयुष्य तर ओंजळीतून जशी वाळू सुटते तसेच हातातून अलगद निसटत असल्यासारखे वाटते, तर मग या सर्व बदलांकडे बघण्याची दृष्टी कशी असावी.

या जगातील प्रत्येक गोष्ट ईश्वराने आच्छादून टाकलेली आहे, कारण हे बदलणारे जग ढगांमध्ये विविध प्राण्यांचे आकार दिसावे तसेच आभासमय आहे. ढगांमध्ये दिसणाऱ्या विविध आकारांत ज्याप्रमाणे न बदलणारा ढग हेच सत्य असतो, त्याचप्रमाणे या बदलणाऱ्या प्रपंचात न बदलणारा हा ईश्वरच सत्य  आहे. हीच गोष्ट ध्यानात घेऊन आपण त्यागमय जीवन जगाव, भोगमय नव्हे. कारण जे सतत बदलत आहे ते मिथ्या आहे, ते लटके आहे, खोटे आहे, त्याचा उपभोग घेण्यात काय अर्थ? त्याचा त्याग करणेच सर्वथा योग्य आहे. दुसऱ्याच्याच का पण स्वत:च्या देखील संपत्तीची हाव बाळगू नका.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu