Shiva is one of the main deity among all other deities in Hindu religion. Shiva is ‘shakti’ or power, Shiva is the destroyer, the most powerful god of the Hindu pantheon and one of the godheads in the Hindu Trinity. Known by many names – Mahadeva, Mahayogi, Pashupati, Nataraja, Bhairava, Vishwanath, Bhava, Bhole Nath etc
सांबसदाशिवाचा महादिवस म्हणजे महाशिवरात्री याबाबत एक मान्यता ही आहे कि या रात्रीत शिवाने महासंहार घडविला होता आणि दुसरी मान्यता ही आहे कि ह्या रात्रीत एकट्या ईश्वराने संपन्न होऊन रचना करण्याचे कार्य आरंभिल होत. पण प्रश्न असा उठतो कि शिव तर ज्योतिर्लिङ्गम आणि अशरिरी आहे; ते संहार कसा व कुणाच्याद्वारे घडवून आणतात आणि नव्या सृष्टीची स्थापना कशी काय करतात?सृष्टीस्थापनेची स्पष्ट रूपरेखा काय आहे?
गोष्ट अशी आहे कि ज्योतीस्वरूप शिव प्रजापती ब्रम्हाद्वारा सतोगुणी सतोप्रधान सृष्टीची स्थापना केली जाते; शंकराद्वारे कलियुगी तमोप्रधान सृष्टीचा महाविनाश केला जातो. ते कलीयुगाच्या शेवटी ब्रम्हाच्या देहांत प्रवेश करून त्यांच्या मुखाद्वारे ज्ञानाची गंगा वाहवितात आणि म्हणूनच शिवाचे ‘गंगाधर’ असे नावदेखील पडले आहे आणि त्याचबरोबर शिवाला ‘सुधाकर’ देखील संबोधतात. कारण सुधाकर म्हणजे ‘अमृत देणारा’.
प्रजापती ब्रम्हा द्वारा भारतातील ज्या माता आणि कन्या गंगाधर शिवाच्या ज्ञानगंगेत स्नान करतात त्याच शिवशक्ती ‘अंबा’, ‘सरस्वती’ या नावाने विख्यात आहेत. या चेतनामय ज्ञानगंगा आणि ब्रम्हाच्या मानसकन्याच शिवाच्या आदेशाला मान देऊन भारताच्या जनमनाला शिव ज्ञानाद्वारे पावन बनवितात. म्हणून शिवाला ‘नारीश्वर’ आणि ‘पतीतपावन’ व ‘पापकटेश्वर’ म्हणतात. कारण शिव मनुष्यात्मांना शक्तिरूपा स्त्रियांकरवी शक्तिरूपा मातांच्या माध्यमाने ज्ञान देऊन पावन करतात. त्यांच्यातील विकारांच्या ह्लाह्लाला म्हणजेच विषाला हरण करून त्यांचे कल्याण करतात आणि त्यांना सहजच मुक्ती आणि जीवनमुक्तीचे वरदान देवून टाकतात. आणि हेच महादेव शंकराद्वारे कलियुगी सृष्टीचा महाविनाशही करतात आणि सर्व मानव आत्म्यांना देह्मुक्त करून शिवलोकांत घेऊन जातात. म्हणूनच शिवाला ‘मुक्तेश्वर’ नावाने संबोधतात.