ज्योती:शास्त्र

Like Like Love Haha Wow Sad Angry Jyotisha (or Jyotish from Sanskrit jyotiṣa, from jyótis– “light, heavenly body”) is the...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Jyotisha (or Jyotish from Sanskrit jyotiṣa, from jyótis “light, heavenly body”) is the traditional Hindu system of astrology, also known as Hindu astrology,Indian astrology, and more recently Vedic astrology.

astrology

ज्योति:शास्त्रात काळाचे विधान सांगितलेले असते. ज्योतिष हा शब्द ‘ज्योती:’ ह्या संस्कृत शब्दावरून मूळ निघालेला आहे. ‘ज्योति:’ या शब्दाचा अर्थ तेज किंवा प्रकाशकारक अवयव असा आहे; त्यावरून मराठीत ‘ज्योत’ हा शब्द झाला आहे. दिव्याप्रमाणे जे प्रकाशदायक पदार्थ आहेत, त्यांच्या प्रकाशकारक अवयवास आपण ज्योत म्हणतो, हे सर्वांनाच माहित आहे. आकाशातील गोलरूप चंद्रसुर्यादिक तेजपुंज तारा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तेजस्वी आणि प्रकाशदायक असल्यामुळे तत्संबंधी विषयास लोक ज्योतिष्य म्हणू लागले असावे. ‘शास्त्र’ या शब्दाचा अर्थ अनुशासन, शिकविणे किंवा नियम असा आहे. तेव्हा ज्योतिष्य विषयांसंबंधी जे शिक्षण किंवा नियम तें ज्योति:शास्त्र होय.

 ज्योति: शास्त्राचे  महत्व :
शिक्षा, कल्प(सूत्र) व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य अशी हि वेदाची सहा अंगे होत. म्हणून वेदाला षष्टांगवेद म्हणतात. ह्या सहा अंगांपैकीच जरी ज्योतिष्य हे अंग आहें, तरी इतर शास्त्राहून ज्योति:शास्त्राचे महत्व मोठे मानलेले आहे. ऋग्वेदज्योतिषाच्या शेवटच्या म्हणजे सातव्या खंडातील या श्लोकाचा,

   ”यथा शिखा मयुराणा नागानां मणयो यथा |

     त्द्वद्वेदांगशास्त्रानां ज्योतिष्य मूर्धनि स्थितम् ||”

अर्थ म्हणजे असा कि मोराची शिखा म्हणजे तुरा म्हणजे जसा सर्वांगात प्रधान अंग जे मस्तक, त्या मस्तकावर शोभतो, किंवा सर्पमणी जसा सर्पाच्या फणेमध्ये असतो, त्याचप्रमाणे वेदांची जी सहा अंगे म्हणजे शास्त्रे आहेत त्या सर्वांच्या शिरोभागी ज्योतिष्याची गणना आहे. यावरून ज्योति:शास्त्राचे महत्व फार मोठे मानलेले आहे, हे स्पष्ट दिसते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
Tags:

Related Stories