पित्त प्रकृतीची ओळख




Like
Like Love Haha Wow Sad Angry

At the core of Ayurvedic philosophy is the concept of the three doshas, the vital energies that make up our physical constitution and are evident all around us. In this interesting article, we tried to identify the characteristics of a person having body type ‘pitta’.

vata-pitta--kapha

पित्त प्रकृतीच्या व्यक्तीची बाह्य लक्षणं :

वर्णाने या व्यक्ती उजळ किंवा गहूवर्णीय असतात. त्यांच्या हातापायांचे तळवे, नखं, जीभ, ओठ लालसर दिसतात. अंगावर तीळ , वांग अधिक प्रमाणात असतात. यांच्या त्वचेला सुरकुत्या लवकरच पडतात. केस लवकर पिकतात व गळतात अधिक. त्यामुळे अवेळी टक्कल पडण्याच प्रमाण पित्त प्रकृतीत असते. केस पिंगट व मुलायम असतात. अंगाला घाम फार येतो( घामाला दुर्गंधी असते ). शरीर विशेषत: हातापायाचे तळवे स्पर्शाला गरम वाटतात.

पित्त प्रकृतीची व्यक्ती दिसायला तेजस्वी असतातच पण बुद्धीमानही असतात. स्वत:च्या विषयांवर त्यांचं प्रभुत्व असतं आणि वादविवादात पित्ताच्या व्यक्ती हार मानत नाही. बोलणं ठासून असतं. साध्या बोलण्याच्या वेळीही भांडण केल्यासारखेच बोलतात. यांचा स्वभाव निर्भय असतो. रागही  लवकर येतो व शांतही लवकरच होतात. पित्ताची व्यक्ती निर्भय असते. पण  त्यांची एक खोच म्हणजे त्यांच्याशी फटकून वागणाऱ्या सोबत ते कठोर वागतात व नम्रतेने वागणाऱ्या सोबत प्रेमाने वागतात.

एखाद्या व्यक्तिची ‘पित्त’ या एकाच दोषाचा प्रभाव असलेली प्रकृती असली तरच वर सांगितलेली सारी लक्षणे दिसतील पण बहुदा अशी एकदोषात्मक प्रकृती अभावानेच आढळते. म्हणून यांपैकी मोजक्या लक्षणांचा प्रभाव काही व्यक्तीतच दिसुन येतो. मात्र तारुण्याचा काळ म्हणजे पित्ताचा काळ. या काळात पित्ताच प्राबल्य असत. त्यामुळे पित्ताची बरीच लक्षणे तरूणपणातच दिसू लागतात. आणि मुळातच पित्त प्रकृती असेल तर पित्ताचा त्रास जाणवू लागतो. अशी लक्षण कां दिसतात याचे कारण म्हणजे पित्त या शरीराच्या शासक दोषात अग्नी या महाभूतांच आधिक्य आहे. साहजिकच अग्नी जे जे करू शकतो ते पित्त करतं. अग्नीच्या प्रभेप्रमाणे पित्तालाही प्रभा असते. त्यामुळे पित्त प्रकृतीत त्वचा कांतीमान दिसते आणि स्निग्ध गुणामुळे मृदूही असते. पित्ताचा आणि रक्ताचा घनिष्ट संबंध. त्यामुळे त्वचेवर, विशेषत: गालावर लाली, ओठावर रक्तिमा पित्तच आणतं. उष्णता निर्माण करणं हे अग्नीच काम; हेच काम पित्त करतं. त्यामुळे शरीराच तापमान वाढतं. तहान, भूक लागणं अन्नाबदल प्रीती वाटणं हि देखील पित्ताची कामं. अग्नी पचन समृद्ध करून घडवून आणतो. पित्ताच्या प्रभावाखाली अन्न पचन असो वा शारीरिक पेशींच्या संदर्भांत घडणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया असोत , असं अंतर्गत प्रक्रियांचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोव्यापार. इथे सतत रुपांतर कार्य घडत असतं, म्हणूनच मेधा ( धारणा शक्ती ) आणि धी ( बुद्धी ) या पित्तावर अवलंबून असतात. शौर्य आणि धैर्य हि पित्ताचीच कार्ये. तसच डोळ्यांना रूपग्रहण करून देण्याचं, आलोचन देण्याचं काम पित्ताचचं.

प्रकृतीवर पित्त दोषांचा प्रभाव असेल तर काही अप्रिय लक्षणांना तोंड द्यावं लागतं. कधी कधी म्हणतात ना काट्याचाच नायटा होऊन व्याधी उत्पन्न होतात; पित्तदोषप्रधान प्रकृतीची व्यक्ती प्रथमपासून नाजूक प्रकृतीची असते. अशा बाळाला उष्ण हवा सोसत नाही. धूपशेक अधिक झाला किंवा गरम कपड्यात ठेवले तरी अंगावर पुरळ उठतात. कोठा हलका त्यामुळे पातळ ‘शी’ होण्याची शक्यता अधिक; आणि जराही जास्त दुध सोसत नाही, लगेचच जुलाब होतात. एवढंच नव्हेतर आईने जेवणात तिखट किंवा उष्ण पदार्थ जेवले तरी बाळाच तोंड येतं. जराही काही झालं कि बारीक ताप येणं, पंडूरोग हे  विकार पित्त प्रकृतीचे. तसंच यकृतरोग होण्याची शक्यताही असते. अधिक मोठे होता होता जर या पित्ताला आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न  केले नाही तर तरुणपणी ( हा नैसर्गिकरित्या पित्ताधीक्य असण्याचा काळ असतो ) पित्ताचे विकार वाढू शकतात.

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं लहान आतडं दुबळं असतं. त्यामुळे उलट्या, जुलाब लवकरच होण्याची प्रवृत्ती अधिक; तसेच घाम खूप येउन कपड्यावर पिवळे डाग पडतात. रक्ताचे विकार या प्रकृतीत अधिक आढळतात. फुटकुळ्या, चट्टे वा इतर त्वचेचे विकार सहज होतात आणि तोंड ही वारंवार येते. डोकेदुखी ही तर पित्तप्रकृतीच्या पाचवीलाच पुजलेली असते आणि जरा काही अधिकउणे खाल्ले कि लगेचच ‘अपचन’ होणं’ अधिक असतं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu