नवलकोलची भाजी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Knolkhol is an europan vegetable, very popular in Kashmir in India. It is a greenish white colored big and round vegetable, somewhat similar to cabbage, although it does not have leaves covering. Also known as Kohlrabi, Kohlrabi greens, Navalkol, Gunth Gobhi, Ganth gobhi.Knolkhol is one of the common vegetables mainly used to prepare subji in the northern region of India.

knolkhol

नवलकोलाची भाजी वेगवेगळे पदार्थ घालून करता येते. मटारचे दाणे, ओले चवळी दाणे, ओला हरभरा, मोडाची मटकी, वालाचे दाणे, बटाट्याच्या फोडी घालून भाजी होवू शकते. तसेच तुरीच्या डाळीचे वरण, मसुराच्या डाळीचे वरण घालूनसुद्धा, बेताचा रसा ठेवून भाजी होवु शकते. नवलकोलाच्या फोडी वाफवून, नंतर फोडणीला टाकून शिजवून, वरून डाळीचे पीठ किंवा भाजनी पेरून सुद्धा सुकी भाजी होवू शकते

भाजीचे साहित्य – कोवळे नवलकोल – तीन ते चार, हिरव्या मिरच्या – पाच, ओले खोबरे – अर्धी वाटी, साखर, फोडणीचे साहित्य.

कृती -: नवलकोलाची साल काढून फोडी कराव्या व पाण्यात टाकून वाफ़वून घ्याव्या. मिरच्या व खोबरे वाटून घ्यावे. नंतर तेल गरम करून हिंग-मोहरीची फोडणी द्यावी. त्यात नवलकोलाच्या वाफवलेल्या फोडी घालाव्या, वाटलेल्या मिरच्या, खोबरे घालावे. चवीनुसार मीठ व थोडी साखर घालावी व पूर्णपणे शिजवून घ्यावी. भाजीला थोडा रस्सा असू द्यावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu