Yuga in Hinduism is an epoch or era within a four age cycle. A complete Yuga starts with the Satya yuga, via Treta yuga and Dvapar yuga into a Kali yuga. Our present time is a Kali Yuga. According to Hindu scriptures, all mortal beings are destined to pass through four great epochs in every cycle of creation and destruction. This divine cycle turns full-circle at the end of what is known as kalpa.
पुन्हा पुन्हा होणारे दीर्घ कालमान त्यास युग म्हणतात. हि युगे एकूण चार आहेत.
१. कृत् युग (सत्ययुग)
२. त्रेतायुग
३. द्वापारयुग
४. कलियुग
या चार युगास चौकडी म्हणतात. कलियुगाचे प्रमाण एकूण ४,३२,००० वर्षे आहे. या संख्येला चारने गुणले कि सत्ययुगाची, तीनने गुणले कि त्रेतायुगाची, दोनने गुणले कि द्वापार युगाची वर्षेसंख्या निघतात. म्हणजे १७,२८,००० कृतयुगाची; १२,९६,००० त्रेतायुगाची; ८,६४,००० द्वापारयुगाची एकूण वर्षे असतात. ही चार युगे म्हणजे एक महायुग होय आणि एक हजार महायुगे म्ह्णजे एक कल्प होतो.
प्रस्तुत कल्पाची एकंदरीत २७ महायुगे संपून २८ व्या महायुगातील कृत, त्रेता आणि द्वापार अशी तीन युगे गत होवून सांप्रत असे चवथे कलियुग चालू आहें. म्हणून पूजेच्या वगैरे नित्य संकल्पात ‘अष्टाविंशतितमे कलियुगे’ असे म्हणतात. प्रत्येक युगाचे लक्षावधी वर्षाचे प्रमाण असल्यामुळे “काहीतरी दीर्घकाळ” अशा अर्थीही व्यवहारांत युग शब्दाचा उपयोग करतात.
* गेलेल्या कलियुगाचे प्रमाण :-
शालिवाहन शक सुरु झाला, त्यावेळी कलियुगाची ३१७९ वर्षे गत झाली होती. म्हणून शालिवाहन शकामध्ये ३१७९ मिळवून जी बेरीज येईल ती संख्या गेलेल्या कलियुगाच्या वर्षाचे प्रमाण होय. आणि तीच बेरीज कलियुगाच्या एकंदर वर्षसंख्येतून वजा केली असता राहील ती संख्या शेष कलीचे प्रमाण होय.
उदा. आता सुरु असलेले शालिवाहन शके १९३४, ह्या साली कलीची किती वर्षे गेलेली आहेत हे काढायचे म्हणजे १९३४; त्यातून ३१७९ मिळविले म्हणजे ५११३ ही बेरीज झाली. ही संख्या कलीच्या एकंदरीत संख्येतून वजा वजा केल्यास म्हणजेच ४,३२,००० यातून ५११३ ही संख्या वजा केल्यास ४,२६,८८७ वर्षे राहतात. ही वर्षे शके १९३४ या आताच्या सुरु सालीपासून कलियुगाची बाकी भोगायची राहिली असे समजावे.