आत्मतीर्थ




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Aatmatirtha is  spiritual concept based on the concept of godliness exists inside of every human being, every living being in the world. Some people rush here and there in search of god, whereas he himself lies inside us.

aatmatirth

सो$हं हेंच आत्मतीर्थ आहे.

इंदतिर्थं इंदतिर्थं भ्रमन्ति तम सावृत्ता: ।

आत्मतिर्थं नजान्ति कथं मोक्षोवरानने ?|| (शिव पुराण)

आत्मतीर्थ न जाणणारे अज्ञानी स्त्री-पुरुष ‘येथे तीर्थ आहे, तेथे देव आहे’, असे समजून जिकडे-तिकडे व्यर्थ भटकतात व तीर्थस्थानातील धोंडा-पाणी याचे दर्शन करून, घरी रिकामे खिसे घेऊन, जसे गेले तसेच अगदी कोरडे ठणठणीत परततात, यांना मोक्ष कसा मिळणार ?

बहुतेक तीर्थक्षेत्रे मुर्तीमंत पापक्षेत्रे बनलेली आहेत ! क्षेत्रांतील अनेक लोकांच्या गुप्तागुप्त पापलीला अहर्निश सारख्या चालूच आहेत. इतर ठिकाणी केलेली पापें तीर्थस्थानी स्वत:च्या उत्कट भावबलाने धूतलीही जातील, पण प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रींच केलेली पापें कोठे व कशी धुतली जावीत ?

आत्मतिर्थात  स्नान करून आत्मजोर्तीलिंग दर्शनाने’ म्हणजेच ‘सो$हं जोर्तिब्रम्ह’ दर्शनाने सर्व प्रकारची पापें समुळ साफ धुवून जातील, हेच याचे एकमेव उत्तर आहें. असे स्त्री-पुरुष पुण्यात्मा, पुज्यात्मा, मुक्तात्मा होय यात संशय नाही. असे जे आत्मतिर्थ तें स्वत:च्या ठिकाणी विद्यमान आहेत. म्हणून बाह्य तीर्थक्षेत्री व्यर्थ भटकण्याची वस्तूत:  मुळीच गरज नाही. स्वत:च्या मनोरंजनार्थ बाह्यतीर्थस्थान पाहून येणे हि गोष्ट निराळी! परंतु अंधश्रद्धेने व मूढ भक्तीभावाने त्याच त्या बाह्य जड क्षेत्रांच्या प्रतिमास, प्रतिवर्षी वारंवार फेऱ्या करणे आणि त्यांतच मोठा अभिमान, गौरव, भूषण व महत्व मानणे, हि निव्वळ मानसिक ‘गुलामीच’ समजावी. तो एक जड संस्कार ‘महारोग’ होय.

परमात्मा आपणापासून दूर किंवा बाहेर नसून तो आपल्यामध्येच ओतप्रोत भरलेला आहे.  ‘सो$हं’ म्हणजे ‘तो परात्पर परमात्मा स्वदेही मीच आहो’. स्वदेहीच या सो$हं जोर्तीलिंगाचे  ‘सूर्यकोटी प्रती प्रकाशं चंद्रकोटी सुशीतलम् ‘ असा दिव्य परम् तेजोमय प्रचंड शक्तीशाली व प्रभावशाली ‘ब्रम्हदर्शनाचा’ लाभ घ्यावा  हा ‘ब्रम्हानंद’ महान अलौकिक अवर्णनीय अढळ असा आहे. जे या सो$हं आत्मतिर्थात अखंड स्नान करतात आणि आत्म जोर्तीलिंगाचे-जोर्तीब्रम्हाचे दर्शन घेतात ते स्त्री-पुरुष साक्षात मूर्तीमंत ‘ब्रम्हस्वरूप’ ब्रम्ह्मुर्ती च होत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu