Brinjal is easy to make and one of the most easily available vegetable in India. There are so many varieties to made brinjal vegetables, one of them is stuffed Brinjal, The delicious brinjal stuffed with ground spices and served with rice, chapati or roti’s.
साहित्य -: छोटी वांगी पाव किलो, धने , शेंगदाणे व तिळ प्रत्येकी दिन चमचे , लसून पाकळ्या सात ते आठ, चवीप्रमाणे तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य, बारीक कोथिंबीर.
कृती -: थोड्या गरम तेलावर धने, शेंगदाणे, तीळ व लसून परतून घ्यावा. त्यात तिखट-मीठ घालून मिक्सर मध्ये फिरवून काढावा, वांग्यांना चिरा देवून त्यात भरावा. भांड्यात थोड्या जास्त तेलाची फोडणी करावी. त्यात वांगी मंद आचेवर पाणी न घालता वाफेवर शिजू द्यावी. वाफेचे जेवढे पाणी होईल तेवढाच रस्सा ठेवावा. नंतर कोथिंबीर घालावी. भाकरी सोबत छान वाटेल. भाजी थोडी झणझणीत तिखट असावी.