पंचतत्वे आणि त्यांची पंचमहाभूते !
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

In Ayurveda, it is said that components & functioning of the nature is similar to our body components and its functions.  Pancha Mahabhuta theory states that everything in the physical creation is composed of these 5 elements.  The very first element that comes to existence is akash (Ether). It is most expansive and least concreate of all. The next element derived is Vayu (Air) then comes Agni (Fire), then Jala (water) element is formed and lastly Prithvi (earth) element is formed.

panchtatve and five great elementsमानवी जीवनाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या जरी असल्या तरी पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि अवकाश यांही तितक्याच मुलभूत गरजा आहेत. यांशिवायसुद्धा मनुष्य जगू शकत नाही. हवेचा विचार केला, तर श्वासोच्छ्वासाशिवाय सरासरी आपण तीन मिनीटांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही ; पाण्याशिवाय आपण तीन दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत  नाही आणि शरीरात ऊर्जा निर्माण होण्याकरीता अन्नाची गरज असल्याने, अन्नाशिवाय तीन आठवड्याच्या कालावधीपेक्षा जास्त काळ आपण काढू शकत नाही. या पृथ्वीतलावर संपूर्ण सजीवांना सुव्यवस्थित जगता यावे याकरिता ; निसर्गाचा समतोल कायम राहण्याकरीता या सर्व मुलभूत गरजांची सुव्यवस्था निसर्गाने करूनच ठेवली आहे आणि या गोष्टींवर जो नियंत्रण ठेवतो, त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. ज्याच्या बळावर चालतो हा पसारा, त्या परमेश्वराला आपण निर्गुण-निराकार, सगुण-साकार अशा परस्पर भिन्न असणाऱ्या विशिष्ट तत्त्वाच्या रूपाने ओळखल्या जातो व चराचरा मध्ये वास करतो म्हणजे व्याप्त असतो. परमेश्वराचा अंश प्रत्येक सजीवात सुप्त स्वरूपात आहे आणि तोच घटाघटांत ब्रम्हज्ञानरुपी ज्योत पेटवून अज्ञानरुपी अंधकार नष्ट करतो. तो निराकार असूनही आकारात कसा येतो? त्याला शरण जाऊन मनुष्य आपल्यातील  पंचतत्वाच्या ज्योती पेटवून, प्राण पणाला लावून त्याला ओळखतो. हे आपल्या सद्गुरूनीं आपल्याला या आरतीतून पटवून दिले आहे, ती म्हणजे

|| ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू रामा, माझ्या सावळ्या रामा |

     पांचाही तत्वाच्या ज्योती लावल्या राणा |

     निराकार वस्तू कैसी आकारा आली ||………

हि पाच तत्त्वे म्हणजेच पंचमहाभुते होत.

मनुष्याचे शरीर म्हणजे पृथ्वी (त्वचा), अग्नी (उष्णता), जल, वायू आणि अवकाश (आकाश-पोकळी) या पाच तत्त्वांनी निर्मित आहे. जन्मापासून तो मृत्यूपर्यंत या तत्त्वांची जीवन-विकासासाठी फार आवश्यकता आहे. धर्मशास्त्र, तर्कशास्त्र , नीतीशास्त्र याचबरोबर योगशास्त्र मनुष्याला शुद्ध ठेवण्यासाठी मदत करते. योगशास्त्रानुसार, योग साधनेने पंचतत्वांना इच्छेनुसार कमीअधिक करता येते.

शरीरातील पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण वाढविल्याने किंवा कमी केल्याने शरीर त्याप्रमाणात हलके किंवा जड होते, जलतत्वाचे प्रमाण वाढविल्याने पाण्यावर तरंगणे किंवा चालणे येऊ शकते, तसेच अग्नीतत्वाच्या प्रमाणानुसार काहीवेळ अग्नी वरून चालणे हे  होऊ शकते, आणि वायूतत्वाचे प्रमाण वाढविल्याने व्यक्ती हवेत तरंगू शकतो किंवा काही काळ उडू शकतो. पण या सर्व गोष्टी योगसाधनेच्या ( शास्त्राच्या) अतिअभ्यासावरून व अनुभवातूनच साध्य आहे. यासाठी योग उत्तम जाणावा लागतो, हे सामान्याचे काम नाही.

उदा:- ज्ञानदेवाने आपल्या योगसाधनेच्या सामर्थ्यातून आपल्या पाठीवर अग्नीतत्व अधिक करून, पाठ गरम तव्याप्रमाणे तापवून पाठीवर मुक्ताईला मांडे भाजायला लावले. हे अग्नीतत्वाच्या अधिक प्रमाणातून साध्य करून दाखविले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu