Karlyachya kachaya is a marathi recipe of making vegetable of bitter gourd. Here in this post , we are describing the method of making veg of bitter gourd such that everyone would love to taste this bitter gourd veg.
साहित्य -: कोवळी कारली पाच ते सहा, एक लिंबू , साखर, तिखट, मीठ चवीनुसार, हरबरा डाळीचे पीठ अर्धी वाटी, तेल तीन ते चार चमचे, ओल खोबर अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य .
कृती -: कारली चिरून त्याच्या पातळ चकत्या कराव्या. बिया काढू नयेत. त्याला दहा मिनिट मीठ चोळून ठेवावे. नंतर पाण्यात धुवून घ्याव्या. हिंगाची फोडणी करून त्यात काचर्या परताव्या. चवी नुसार मीठ घालून परताव्या. नंतर डाळीचे पीठ घालून चांगल्या खरपून घ्याव्या. त्यात चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन चमचे, लिंबाचा रस टाकावा, एक चमचा साखर घालून मंद आचेवर परतावे. नंतर खोबरे किस घालावे व शिजू द्यावे, खोबर्यामुळे भाजी कडू लागत नाही.