तोंड येणं: आरोग्य आणि आयुर्वेद
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Boils in Mouth: Health and Ayurveda, This article will guide you on Boils in Mouth, Providing guidelines on ideal daily and seasonal routines, diet, behavior and the proper use of our senses.

Health and Ayurveda

तोंड येण्याला आयुर्वेदात ‘मुखपाक’ म्हणतात.बर्याच लोकांना हि तक्रार नेहमीच असते. तोड आलं कि ओठ, हिरड्या, गालाची आतली त्वचा, जीभ, टाळू किंवा मागचा भाग या सर्वच भागाची आग होते. तिखट आजिबात सहन होत नाही.  करीता यावर अनेक घरघुती उपचार आहेत.

एक म्हणजे खदिर चूर्ण. ५०० मी.लि. खादीर चूर्ण एक ग्लास पाण्यात मिसळून त्याने गुळण्या कराव्या. खादीर चूर्ण म्हणजे काताची पावडर, हे घरी नसले तरी दुकानात सहज मिळतो. त्रिफळा चूर्णाचा काढा  करून त्याने गुळण्या कराव्या. किंवा शंखजिर्याची पावडर तोंडात आतून लावावी.

पण तोंड येणं याचे मुळ कारण म्हणजे पोटात आहे. बहुदा तोंड आले असता भूक मंदावते. आणि कोठाहि साफ होत नाही त्याकरिता आधी एरंडेल तेल किंवा त्रिफळा चूर्ण घेऊन प्रथम कोठा साफ करावा. आणि वारंवार तोंड येत असल्यास कुठल्या धोशाची विकृती आहे हे बघणे महत्वाचे आहे.

त्यातच वाताची विकृती असल्यास ओठ सुकल्यासारखे वाटून जिभेवर कात्रे पडून चिरल्या प्रमाणे त्रास होतो. तोंडावर व्रण देखील पडतात एक व्रण मिटत आला कि दुसरे व्रण तयार होतात. थंड पाणी पिणे नकोसे होते.

अश्या वेळी पिंपळी, वेलदोडा, सैंधव याच वस्त्रगाळ चूर्ण समभाग घेऊन ते दुधाच्या सायीतून किंवा तुपातून आतून लावावे. तिळाच्या तेलाचा गुळण्या केल्याने आराम होतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu