Bharlya Mirchya :
Bharlya Mirchya , Bharwan Mirch or Stuffed Pepper makes a perfect side dish to go along with Chapati or Bhakari. It’s got nice and spicy stuffing of potato, onion, ginger paste etc, which gives it a nice flavor.
साहित्य -: चार-पाच गोलाकार भोपळी मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, बारीक चिरलेले आले, लसून, मिरची दोन टेबलस्पून, लिंबाचा रस, थोडी साखर, बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी, थोडी हळद, तेल आणि मीठ .
कृती -: मिरच्यांच्या देठांच्या बाजूच्या चकत्या काढून आतील बिया काढून पोकळी तयार करून घ्याव्या मिरच्यांच्या आतून थोडे मीठ लावून घ्यावे व बाहेरून तेल लावून घ्यावे व बटाटे सोलून कुस्करून घ्यावे.
तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा त्यात चिरलेले आले,लसून,मिरची घालावी परतून घ्यावी नंतर त्यात कुस्करलेला बटाटा, मीठ , हळद, किंचित साखर, व लिंबाचा रस घालून चांगले परतून घ्यावे. हे सारण तयार झाले कि मिरच्यांमध्ये भरून घ्यावे. नंतर त्या मिरच्या एका पसरत भांड्यात तेल घालून व्यवस्थित ठेवून शिजवाव्या.