Lal Bhoplyachi Bhakar Bhaji Recipe is a famous food of Maharashtra. for change you can cook this dish. this is basic food of Indian people.
साहित्य – : तांबडा भोपळा अर्धा किलो,सुक्या खोबर्याचा कीस मोठे दोन चमचे, खसखस एक मोठा चमचा, चारोळी दोन चमचे, तीनते चार हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा, चवी नुसार तिखट, मीठ, गुळ, कोथिंबीर.
कृती -: भोपळ्याच्या सालासकट मोठ्या फोडी कराव्या, खसखस, खोबरे, आलं, मिरच्या, चारोळी वाटून घ्यावे, गरम तेलात हिंग, मोहरी, मेथी, हळद घालून फोडणी द्यावी नंतर त्यावर वाटलेला मसाला घालून तेल सुटे तोवर परतावे नंतर भोपळ्याच्या फोडी घालाव्या व दोन मिनिटे परतत राहावे. नंतर थोडे पाणी घालून ढवळावे व झाकण ठेवून शिजू द्यावे, थोडी शिजत आल्यानंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ व गुळ ( किसलेला ) घालावा व शिजवावा पण शिजल्या नंतर भाजीला थोडा रस्सा असू द्यावा. शेवटी कोथिंबीर बारीक चिरलेली घालावी गरम असतानाच घालावी.