Udadachi Amti :
Amti is on of special recipe of Maharashtra, You need to use split urad dal for this dal. This recipe prepare in lunch or dinner. Enjoy Indian Food Udadachi Amti. Recipe tips for preparing Udadachi Amti.
साहित्य : एक वाटी आख्खे उडीद, १ मोटा कांदा, ७-८ लसून पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ लाल सुक्या मिरच्या, १ मोटा आल्याचा तुकडा, २ टोमटो, १ टी.स्पून दही, १ टी .स्पून क्रीम, अर्धा चमच गरम मसाला, तूप, मीठ इ.
कृती :- कांदा, टोमटो, आले, लसून, हिरव्या मिरच्या सर्व बारीक चिरावे.
आख्खे उडीद धुवावेत. त्यात थोडा चिरलेला कांदा, थोडे आले, लसून, मिरच्या व थोडा चिरलेला टोमटो घालून प्रेशर कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या येइपर्यंत शिजवून घ्यावेत. नंतर घोटून घ्यावेत. मीठ घालावे.
तुपाची फोडणी करावी. त्यावर आले व लाल मिरच्याचे तुकडे घालावे. जरा परतावे. त्यावर घोटलेले उडीद घालावेत. चांगले उतरवावे. दही घालावे व जरा उकळले की उतरवावे. वरून क्रीम व टोमटोच्या फोडी घालून सर्व्ह करावे.