Tu Marathi Kavita |Marathi Kavita Sangrah | Tu Marathi Kavita
तु असली कि, कसं प्रसन्न वाटत बघ.
तु नसलीस कि, मन कसं कोमेजत बघ.
तु असली कि, पसाऱ्या वरूनही हुज्जत घालायला
आवडत बघ.
तु नसलीस कि, त्याच पसाऱ्याशी हुज्जत घालत एकटाच रडहसका होतो बघ.
तु आरसा पुसत माझ्याकडे बघुन लाजतेस, गुपित धन सापडल्याचा आनंद होतो बघ.
तु नसलीस कि, तो आरसाही माझी माझी टर्र उडवून हसतो बघ.
तु असली कि, मे महीनाही ढगाळलेला वाटतो बघ.
तु नसलीस कि, पाउसही डोळ्यांतुन पडु पाहतो बघ.
तु असली कि, आत किशोर कुमार गुणगुणतो बघ.
तु नसलीस कि, कुठुनतरी जगजीत कानांवर पडतो बघ.
तु असली कि, अंगणातील फुलं कशी डुलतात बघ.
तु नसलीस कि, ती ही चेहरा पाडून असतात बघ.
तु असली कि, घड्याळाचे काटे कसे वेग घेतात बघ.
तु नसलीस कि, ते ही जड पावलांनी चालतात बघ.
अस होउ शकत का ग? कि तु नसलीस ना हा विचारही विचारांच्या डोक्यात येउ नये.