Premamadhe Kahipan Marathi Kavita | Marathi Kavita Samuha | Marathi Kavita Sangrah
झालं मला प्रेम एका मुलीशी
तिला भरपूर देईन मी खुशी
तिचं पण हो होतं अन् माझं पण हो होतं
म्हणूनि नाते अतूट होते, माझे अन् तिचे.
पाहिजे तेव्हा बोलवायची
पाहिजे तेव्हा मदत पुरवायची
तिच्यासाठी सावली ऊनामध्ये
अन् छत्री पावसाळ्यामध्ये
तिच्यासाठी पडलो मी अनेक पंग्यांमध्ये
तिच्याविना रस नाही जगण्यामध्ये.
तिच्यासाठी मी झालो हमाल
‘मी कोण आहे?’मलाच पडला सवाल
कामांसाठी मीच होतो
खुप केलेस माझे हाल.
तुझ्यासाठी सोडलं ते मी घराण
मित्रांशी सततची माझी भांडण
विसरुनी टाकलं मी माझं जगणं
केलं मी तुझ्यासाठी एवढं…..
फक्त अन् फक्त तुझ्यासाठी ..!