1
Prayatna Marathi Kavita | Marathi Kavita Samuha | Marathi Kavita Sangrah
मला माहित आहे तु मला
सोडून जाशील एकेदिवस म्हणून
तुजसह अख्खं आयुष्य जगण्याचा
प्रयत्न मी करीत आहे…
माझ्या इवल्याश्या आयुष्यात तुला
खुश ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे…
जगुन घे खुप सारे माझ्यासोबत कारण
तु मला सोडण्याचा प्रयत्न करीत आहे…
तुझ्या प्रयत्नात तु अपयशी व्हावी
असा प्रयत्न मी करीत आहे…
अपयशी अश्या तुझ्या प्रयत्नांना
न पाहण्याचा प्रयत्न मी करीत आहे…
अपयशाने उदास ना होवो तु म्हणून
हरण्याचा प्रयत्न मी करीत आहे…
1