Modaychya Kad Dhanyachi Bhel :
It is bhel with lots of vitamins made with mixed sprouts. You can serve it with some farson, sev papdi or Mumbai bhel , and chopped onion to make misal and if to that you add some fresh curd while serving, then it becomes dahi misal.
साहित्य -: पिवळे हरभरे, मसूर, मुग, मटकी, चवळी, भिजवून मोड आलेले प्रत्येकी अर्धी वाटी. बारीक चिरलेला कांदा एक वाटी, अर्धी वाटी ओले खोबरे, पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, बारीक शेव एक वाटी, टोमाटो च्या फोडी अर्धी वाटी, चवी प्रमाणे मीठ, तिखट .
कृती -: प्रथम मोड आलेली कडधान्ये थोडी हळद घालून पाणी न घालता कुकर मध्ये दोन शिट्या कराव्यात व वाफवून घ्याव्या. कडधान्या बरोबर थोडे फार पाणी येतेच म्हणून पाणी घालण्याची गरज नाही. वाफवलेली कडधान्ये कांदा टोमाटो फोडी, कोथिंबीर, आवडी प्रमाणे तिखट, मीठ घालून थोडे मिक्स करावे. खायला देताना डिश मध्ये भेळ घालून त्या वर बारीक शेव, थोडे ओले खोबरे पसरावे व सोबत लिंबाची फोड द्यावी.