Mi Pahilay Marathi Kavita | Marathi Kavita Samuha | Marathi Kavita Sangrah
मी पाहिलयं…..
तुझं हसणं, तुझं रडणं
तुझं रुप, तुझं मन
हरलो होतो मी या चौकटीत
या जगात जगणं नाही तुझंविन
हे तु मनामध्ये जागवलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
मी पाहिलयं…..
तुझ्या डोळ्यांत एक लूप्त आहे भावना
ती हळूच हळू करते माझ्याशी सामना
सदासुखी ठेवो तुला, देवापुढे हीच कामना
देवाशी येथेच माझं घोडं अडलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
प्रत्येक दिवस थांबलो मी
वाट क्षणाक्षणाला पाहिली मी
आता काय शिल्लक राहिलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
बोलत असतो मी हजारो मुलींशी
म्हणूनि तू घेतेस संशय माझ्यावरी
काहीच नसे त्यांच्या मनी
एकच राहिलं मैत्रीचे नाते जीवनी
आतातरी असेल तुला कळालं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
प्रेम झालं तुझ्याशी म्हणूनि
कधीच न सोडणार साथ
मला काय माहिती,तूच
नाही कधी देणार साद
तुझ्यासाठी मित्रांशी बोलणं टाळलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
कामाआडे बोलते माझ्याशी
नाहीतर काहीच नसते शब्दांशी
करतेस विनवण्या माझ्यापुढे
काम तुझे ते स्वार्थासाठी
तुझे स्वार्थपण खूप घडलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
उत्सुकता असायची रोज तुला बघण्यासाठी
तु आली नाही म्हणूनि विचारतो मनासाठी
फोन करितो रोज मनमोकळा बोलण्यासाठी
साथ फिरतो तुझ्या इच्छेसाठी अन्
जगतो फक्त तुझ्यासाठी
हे गेली तु विसरुन सगळं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं…
कदाचित तू देखील हे पहायला हवं होतसं ..!!