Leki Maze Marathi Kavita
लगन करून लेकी माझे
दूर दूर जाताना||
शब्द ओठात येत नाहीत
तुला निरोप देताना
डोळ्यासमोर माझ्या तू
छोटी छोटी बाहुली होती||
तुझ्या बापाची आणि माझी
मिळून एक सावली होती||
सावली आता चालली आहे
तिचा संसार मांडायला
सासर आणि माहेराचे
धागेदोरे बांधायला
डोळ्यामध्ये आसू घेऊन
तू आता हसू लाग
वही-पुस्तक खूप झालं||
मान्संसुध्या वाचू लाग
हक मारताच धावून येतील
अशी काही नाती ठेव
कुंडीमधल्या तूळशीसाठी
थोडी ओली माती ठेव
मोठं मोठं झाल्यासारखा
तुला आता वाटू दे
थोड्या कडू थोड्या गोड
आठवणींना साठू दे
त्याचं कमी येतात ग़
दुसर काही येत नाही||
सोनं-नाणी, पैसा-आडका
सोबत कुणी येत नाही||
जग फसवं झालय ग
कान जरा पक्के ठेव
डोळ्यात धूळ फेकेल कुणी
कातडीला डोळे ठेव||
1 Comment. Leave new
अंतकरणाला भिडणारी कविता