1
Lal Gulab Marathi Kavita
भिक मागता मागता
एक भिकारी बोलला
मला जायचा दिलीला
मत घावो भिकाऱ्याला
दान घेऊन मताच
जावा जाईन दिलीला
माझ्या दानशूर राजा
तुला लावीन भिकला
तुझं उपकार मोठं
माझ्या मनामंदी जाग
येता हातामंदी सता
लावू जिंदगीला आग
घाम गाळणाऱ्या देवा
कसा विसरू मी तुला
तुझ्या घामानंत माझा
नवा बंगला धुतला
तुझ्या बंगल्याच्या म्होर
लाल गुलाब फुलला
माझ्या रगताचा रंग
त्यानं पिऊन घेतला
तुझ्या गाडीचार दिवा
जवा लाल लाल व्हतो
माझ्या उरातर तवा
नवा अंगार पेटतो
मीठ भाकरी खाणारी
बाळ अजून भुकेली
नाही मिळालर पाणी
गाय हबरून मेली
अशी कितीदा कितीदा
केल्या सुखाच्या तू याघ्या
माय बहिणी उघड्या
किती जोडाव्या र चिंध्या
तुझा आनंद सोहळा
दाही दिशांनी पहिला
एका कोपऱ्यात माझा
गाव उपाशी राहिला
भोग भोगतो भूकेचे
तुझा मोडका संसार
घाम गळणाऱ्या देवा
तुझ्या ताटात अंधार
1