Konasathi Marathi Kavita : Marathi Kavita Samuh | Maraathi Kavita
आठवणी तुझ्या त्या, सतावणार्याच सार्या
होते का तुझी ही तलमल…कोणासाठी?
क्षण तो डोल्याताला, चोरटा अन ओझरता
ते नजर हटवने तुझे…………कोणासाठी?
ओठ ही तुझे असे की, वेडात भर पडावी
रंगात रंगणे ते…कोणासाठी?
मग माझीही कट्टी, पण काय बोलू सुचेना
अन नखरे तुझे ही …कोणासाठी?
स्पंदने फिरतात सेर भेर ह्रुदयातली
भम्बावतेस का तू ही…कोणासाठी?
तगमग तुझी अशी, अन माझीही
सांग मग येशील का माझ्याचसाठी?