“आई “




Aai Marathi Kavita


aai
आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेल
जाव असतं!

सर्वात असते तेव्हा
जाणवत नाही
आता नसली
कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते
पालं उठतात
पोरक्या
जमिनीत
उमाळे
दाटतात

आई मनामनात
तशीच
जाते ठेवून काही
जीवाचं जिवालाच
कळावं असं
जाते देऊन काही

आई असतो
एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा

घर उजळत
तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात
कि सैरावैरा धावायलाही
कमी पडत राण !

पिक येतात
जातात
माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागात नाही
तहान
दिसत काहीच नसलं
डोळ्यांना
तरी
खोदत गेलल
खोल खोल
कि सापडतेच अंत : करणातील
खान
याहून का निराळी
असते आई ?

ती  घरात नाही
तर मग
कुणाशी  बोलतात
गोठ्यात
हबरणाऱ्या गायी?

आई खरच
काय असते
लेकराची
माय असते
वासराची
गाय असते

दुधाची
सात असते?
लंगड्याचा
पाय असते
धरणाची
ठाय असते !

आई असते
जन्माची शिदोरी
सरतही नाही
उरतही नाही
आई एक
नाव असतं
नसते तेव्हा
घरातल्या घरात
गलबलंलेलं गाव असतं !

Like
Like Love Haha Wow Sad Angry
18




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड