वृद्धात्वावर विजय
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Vrddhatva Win, The human body is made ​​up of the basic cells from each of the cells in the body cells are very fragile, cells, DNA, chromosomes, and is constantly facing adverse conditions every day. This comes in contact every cell environment. UV rays from the sun that is produced, various toxic chemical substance, as X- rays and pollution is having the relationship in daily life . Although some of the changes in Vancyamulehi Sarirantargata body makes this change is not constant .

old-gen     मानवी शरीर ज्या मुलभूत पेशीपासून बनलेले असते त्या पेशी अतिशय नाजूक असतात शरीरातील प्रत्येक पेशी, पेशीतील डीएनए, गुणसूत्रे यांना रोज अनेक प्रतिकूल परिस्थितीशी सतत सामना करावा लागत असतो. वातावरणाशी या पेशींना रोज संबंध येतो. सूर्यापासून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांशी, विविध विषारी रासायनिक पदार्थाशी, क्ष- किरणांशी व प्रदूषणाशी जसा दैनंदिन जीवनात संबंध येत असतो. तसेच शरीरांतर्गत  होणारे बदल यांच्यामुळेही शरीरात काहीना काही तरी बदल हा सातत्याने होत असतो. माणसाला जगण्यासाठी सतत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करावे लागत असतात. आपण ज्या पृथ्वीवर जगतो आहोत त्या पृथ्वीतील घटकांपासून जसा आपल्या शरीराला धोका असतो. तसाच धोका अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाऱ्या प्रचंड शक्तिशाली किरणांचा असतो. ते मानवी शरीरावर सातत्याने प्रतिकूल परिणाम घडवून माणसाचा नाश करायलाच टपलेले असतात. सुप्तावस्थेत जगणाऱ्या माणसालाही दुर्व्यवस्थेकडे नेण्याची ही क्रिया सातत्याने सावर्त्रिकरित्या चालू असते. जेथे योग्य असेल तेथे अयोग्य करायचे. जेथे नीटनेटकेपणा असेल तेथे विस्कळीतपणा आणायला, जेथे शांतता असेल तेथे गोंधळ. मनुष्य प्राणी जन्माला येतो तेव्हाच तो विनाशाकडे किंवा मृत्यूकडे चाललेला असतो. आपण जगणे हे सुद्धा आपल्याला मृत्यूकडे नेत असते. विनाश हा एकाच दिशेने पण हळूहळू होत असतो. विनाश क्रिया ही थोपवू शकत नाही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ती वेगवेगळी असू शकेल. पण ती नाहीच असे कोणीच म्हणू शकणार नाही. शरीर या यंत्राला सुद्धा हळूहळू गंज चढू लागतो, त्याचे विघटन होऊ लागते आणि एकदा हि वृद्ध होण्याची क्रिया चालू झाली म्हणजे ती उलटी फिरवून तुम्ही परत तरून होऊ शकणार नाही. तुम्ही मनाने रुग्ण होऊ शकाल पण शरीराने होऊ शकणार नाही. शरीराबरोबर मनालाही गंज चढू लागला कि मात्र तुम्ही जिवंत असूनही तुमचा विनाशच झाला असे म्हणायला लागेल.

जन्म व मृत्यू हे परस्परावलंबी आहेत. एक आहे म्हणून दुसरा आहे ज्याची निर्मिती होते त्याचा विनाशही होणार आहे. जगाचा नियमच आहे. जन्माला आलेले माणूस या जगाचा निरोप घेणार हा निसर्गनियम आहे. या नियमाविरुध्य कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या शरीराची झीज होणार आहे. आणि आपण म्हातारे होणार हा निसर्गक्रमच आहे. यालाच एजिंग प्रोसेस असे म्हणतात. एजिंगवर जर आपल्याला विजय मिळवायला लागेल.

विनाशाकडे वाटचाल चालू असतानाही मानवी शरीर सतत आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असते. आपले शरीर हे मुळातच साचेबंद, शिस्तबद्ध असते आणि प्रतिकूल स्थितीतही ते चांगल्या स्थितीत प्रयत्न करीत असते. आपल्या शरीराची रचनात तशी असते. म्हणूनच आपण हा प्रतिकार करू शकतो. शरीरातील पेशीमध्ये असलेल्या या नैसर्गिक शक्तीचे प्रत्येक मानवाने आभारच मानले पाहिजेच. कारण विनाशाकडे नेणारी शक्ती ही सुद्धा अधिक सक्षम असते आणि त्या शक्तीला प्रतिकारक करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नसते. आपल्या शरीरात प्रतिकार करणारी संस्था असते. तीच सतत अनावश्यक व परकीय गोष्टींचा प्रतिकार करीत असते. विनाश होण्याच्या प्रक्रियेस आवश्यक असणार्या प्रतिकार शक्तीचा विकास होय असतो.

उत्क्रांती आणि विकास होण्यास अंत नाही. ती सततची क्रिया आहे. आणि जितकी गुंतागुंत अधिक, विकसित होत जाणार आहे. त्याची अधिक प्रगती होणार आहे. प्रगतीपथावर वाटचाल करत राहणं याचा अर्थ बुद्धिमतेचा विकास होत राहणे असाही आहे. माणसाची शक्ती ज्या मेंदूत आहे, त्यावर बुद्धीमता अवलंबून असते आणि संपूर्ण प्राणीमात्रात सर्वात विकसित भाग कोणता असेल तर तो मेंदू. मेंदू आपल्याला मिळालेली देणगी आहे. ज्या शक्तीने मानवाला निर्माण केले त्या शक्तीने मानवाला मेंदू देऊन एक मोठे दानच केले आहे. या दानाचा वापर आपण मानवाल विनाशापासून थोपविण्यासाठी केला नाही तर तो नाकर्तेपणा होईल. त्या दिशिने आपण वाटचाल तर करत नाही ना? ज्याला मेंदू आहे, त्याच्याजवळ बुद्धिमता आहे आणि ज्याच्याजवळ बुद्धिमता आहे त्याच्याजवळ निर्मिती क्षम ऊर्जा आहे. अगदी मृतवत झालेल्या संवेदनांना पुन्हा जागृती प्राप्त करून देण्याची ताकद बुद्धीमध्ये असते. पण एकदा का माणूस विनाशाकडे जाऊ लागला को त्याची बुद्धीही कमीकमी होऊ लागते. उत्पती, स्थिती व लय या तीन अवस्थांमधूनच प्रत्येकाला जावे लागते. जन्माला आलेले बाळ हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करायला लागते. जन्म म्हणजे उत्पती आणि लय म्हणजे विनाश याच्यामधील अवस्था म्हणजे स्थिती होय आपण सर्व जण आता स्थिती अवस्थेत जगत आहोत. उत्पती व विनाश यांचा संघर्ष सातत्याने चालू असतो.

शरीरातील निर्मिती झीज या दोन्ही क्रिया एकाचवेळी चालू असतात. शरीरातील प्रत्येक भागामध्ये नवीन पेशीची जशी निर्मिती होत असते तशीच त्यात भागात पेशींची झीज किंवा विनाशही होत असतो. तसेच काही रासायनिक क्रियाही होत असतात.

ज्यामुळे नवीन प्रथिने निर्माण होत असतात. काही विधायक घटक निर्माण होत असतात त्यामुळे अत्रपचनास मदत होत असते. अगदी साधे उदाहरण घायचे झाले तर आपण जे अत्र खातो ते तसेच पचविता येत नाही म्हणून त्या अत्राचे विभाजन व विघटन शरीरातील रासायनिक क्रियामार्फत केले जाते. आणि त्यामुळे ते अत्र पचण्यास मदत होते. याचाच अर्थ विघटन किंवा झीज घडवून आणणाऱ्या क्रिया या काहीवेळा शरीराला उपकारकच ठार असतात.

आपल्या शरीरात सर्वात महत्वाची क्रिया होत असते ती म्हणजे चयापचय. या चयापचय क्रियेत पचण्यास कठीण असलेल्या घटकांचे रुपांतर सध्या सहज पचणाऱ्या अशा घटकानमध्ये केले जाते. हे विघटन म्हणजे एक प्रकारचा बदलच असतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu