This article will let you know about your spirit and how to Understand the Spirit and Body. Have you ever wondered what the difference is between the spirit and the soul. This article will teach you about the connection between your body and spirit.
मनुःष्य जातीचा बहुतेक भाग अधोगतीला जात आहे. पूर्ण परिपक्व व बुद्धिमान असून सुद्धा ज्या मार्गाचे अनुसरण करायला हवे ते तो करीत नाही. जो कल्याणकारी आहे. धनाच्या मोहात पडून मूर्ख लोक अयोग्य कार्याकडे प्रेरित होत आहे आणि त्यालाच सुखाचे मूळ समजून आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याला विसरून बसलेला आहे. आत्मतत्वावर विचारच करीत नाही. मनुष्याच्या या मुर्खतेला काय म्हणावे? जो मोठा ज्ञांनी असल्याचा दावा करतो पण स्वत:ला समजू समजू शकला नाही. या साठी आत्मज्ञान हीच प्रक्रिया आहे ज्या द्वारे या समस्येचे सामाधान होवू शकते.
बाह्य वस्तूचे अवलोकन करू नका जरा याचा विचार सुद्धा करा कि शरीरामध्ये कशा विचित्र हालचाली होत आहे. आहार पोटात जातो आणि त्याचे कसे रुपांतर होते. रस, रक्त, मास. अस्थि इ. सप्त धातू मध्ये रुपांतर होते कितीतरी हानिकारक वस्तुंचे भक्षण करून सुद्धा मनुष्य जिवंत राहतो ते कोणते असे विलक्षण अमृत तत्व आहे जे शरीरा सारख्या महत्वाच्या यंत्राला चालवीत आहे. आत्म्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे.
आत्म्यामध्ये भिन्न गती नाही. सर्व जग आत्मामय आहे. आत्म्यापेक्षा वेगळे काहीच नाही. आत्म्यापेक्षा भिन्न एक तृन सुद्धा नाही. विश्वव्यापी चैतन्य अनादि तत्व आत्म्याला समजल्याशिवाय मनुष्याला शांतता व स्थैर्य मिळू शकत नाही. यशस्वी जीवन जगण्याची इच्छा असणार्याला या वर वारंवार विचार करायला हवा. प्राचीन धर्मग्रंथ, सृष्टी व अध्यात्माचा शोध घ्यायला हवा. स्वत:ला ओळखण्यासाठी आपला आत्मा, मनोवृत्ती, स्वभाव व विचारांचे निरीक्षण करायला हवे. आत्मभाव जागृत करण्यासाठी सुंदर आत्मज्ञान पुस्तकांचा स्वाध्याय करायला हवा.
आत्म्यासोबत जन्म-मरण, सुख-दु:ख ,भोग-रोग इ. ज्या अनेक विलक्षणता विद्यमान आहेत त्या मनुष्याला हा विचार करायला भाग पाडतात. खाउन-पिवून इंद्रियांचे भोग भोगून दिवस पूर्ण करणे हीच जीवनाचे साध्ये नाहीत.रूप व शारिरीक सौंदर्याच्या झगमगाटात शरीर व प्राणाच्या संयोगाच्या स्थितीला दुषित करणे,कोणत्याही प्रकारे योग्य नाही. असे अमुल्य मनुष्य जीवन मिळून सुद्धा जर आत्म कल्याण केले नाही तर किती वर्ष्यापर्यंत पुन्हा अनेक कष्ट साध्य योनीत आपल्याला भटकावे लागेल ! ज्याला हि सद्बुद्धी मिळाली त्याने स्वत:ला परमेश्वराचे कृपा पात्रच समजायला हवे. आत्मज्ञांन प्राप्त करून मनुष्य जीवन धन्य कारावा .
मनुष्य हा दैवीशक्तीयुक्त आहे,सतचीत्त आनंद स्वरूप आहे, अपयश, दु;ख,रोग-शोक हे तर तुच्छ विचार, कल्पना व भोगवादी दृष्टीकोनातून उत्पन्न होतात. नाहीतर या अभावांचा या जीवनाशी काय संबंध ? आपल्या अमृत तत्वाचा शोध घेण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, भ्रम, तिरस्कार शंका व दुविधेच्या चिखलातून निघून आपल्याला सत्य, प्रेम, निष्कपटता, व पवित्रतेचा आदर्श स्वीकारावा लागेल. उत्कृष्ट, सुदृढ व दिव्य विचारांना श्रेष्ठ बनवावे लागेल. आत्मा हा अत्यंत अविनाशी व विशाल आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी व त्यात विसर्जित होण्यासाठी आपल्याला सुद्धा तितकेच निर्मळ, हितकारी व विस्तृत व्हावे लागेल. ज्यादिवशी अशी स्थिती तयार होईल त्यादिवशी कोणत्याच प्रकारची कमतरता जाणवणार नाही. आपल्या आत लपलेल्या आत्म्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व काही आपण मिळवू शकतो ज्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत भटकावे लागते आणि ज्याच्या अभावे नेहमी दु:खी राहावे लागते.