The Old Man Friendship, Each person ‘s body is vahataca source of energy and knowledge . Senility is no exception . The knowledge and the energy you do not use the right . This is the whole human kind of damage . Awareness for the following things should be considered in each vavyakaktine. Your body is constantly giving you some information and communication ..
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात उर्जेचा व ज्ञानाचा स्त्रोत वाहतच असतो. वृद्धत्वही त्याला अपवाद नाही. यात ज्ञानाचा आणि उर्जेचा आपण योग्य उपयोग करीत नाही. हे संपूर्ण मानव जातीचे नुकसान आहे. यासाठी खालील गोष्टींचा जागरूकतेने प्रत्येक वव्यकक्तीने विचार केला पाहिजे. तुमचे शरीर सतत तुम्हाला काही तरी संदेश व सूचना देत असते. त्याकडे आपण बरेच वेळा दुर्लक्ष करीत असतो. प्रत्येक वव्यकक्तीने स्वतःच्या शरीराचे सूक्ष्मपणे सतत निरीक्षण करत राहिले पाहिजे. म्हणजे आपले शरीरच त्याला काय हवे आहे, कशाची गरज आहे हे सांगत असते. हे तुमच्या लक्षात येईल. एक गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की, अमुक अमुक गोष्टींचा माझ्या शरीराला सवय झाली आहे. पण सवय म्हणजे शरीराची प्राकृतिक गरज असलेच असे नव्हे. सवय हि तुम्ही निर्माण केली आहे. म्हणजे ती शरीराची कुत्रिम गरज आहे. शरीर हे तुम्हाला वेळोवेळी त्याची नैसर्गिक गरज काय आहे ते सांगत असते. सवय म्हणजे गरज नव्हे. हि गरज काय आहे हे प्रत्येक माणसाचे शरीर काही ना काही संदेश देऊन आपल्याला सांगत असते. पण शरीराकडे आणि शरीरात ” अंदर झांक कर ” बघण्याची आवश्यकताच आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे अनावश्यक गोष्टींची सवय आपण शरीराला लावत असतो, ते टाळले पाहिजे:
शरीरातील काही भाग तुम्हाला सांगत असतात कि त्यांना काही तरी त्रास होतो आहे. डोके दुखू लागल्यावरच आपल्याला डोके आहे हे कळते. गुडघा दुखायला लागला कि गुडघा त्याचे अस्तित्व दाखवू लागतो. शरीरातील जे जे भाग आपले अस्तित्व दाखवू लागतात त्या भागांवर आपण जाणीवपूर्वक लक्ष घायला लागतो. त्या भागांवर आपल्यातील शकत केंद्रित करायची. या ऊर्जेमुळे, या शक्तीमुळे बरे होण्याची किंवा एखादी जखम भरून येण्याची क्रिया सुरु होते. असे लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्रिया असते तिला चालना दिली जाते आणि हि भरून येण्याची क्रिया लवकर होते. म्हणून प्रत्येकवेळी शरीरात डोकावून पाहायला शकले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात इच्छाशक्ती असते. प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यांसमोर काही ध्येये ठेवलेली असतात. ती आपण साध्य किंवा ध्येय हि वेगळ्या स्वरूपातील आपली गरजच असते. शरीर आणि मन हे दोन्ही समन्वयाने आणि एकत्रितपणे काम करू लागले कि हि इच्छाशक्ती वाढण्यास मदत होते. इच्छाशक्ती असेल तर माणूस ध्येपुतीही करू शकतो. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढवून माणूस अधिक सामर्थ्यशाली होणे हि प्रत्येक माणसाची अत्यावश्यक गरज आहे. मन वृद्ध होत नाही त्यामुळे म्हातारपनीही मन सामर्थ्यशाली बनू शकते.
या गोष्टींचा एकत्रितपणे आणि योग्य पणे वापर केला तर शरीरातील प्रत्येक भागावर आपण चांगल्यात तऱ्हेने संस्कार करू शकतो आणि आपणच आपल्या शरीर व मनाला अध्यात्म म्हणजे काय हे शिकवू शकतो. शरीर व मनाला आध्यत्मिक शिक्षण देणे हे प्रत्येक व्यक्ती स्वतःच करू शकतो. आणि आपणच आपल्या शरीर व मनाला अध्यात्मिक म्हणजे हे शिकवू शकतो. शरीर व मनाला आध्यत्मिक शिक्षण देणे हे प्रत्येक व्यक्ती स्वत:च करू शकते.
मनाला प्रशिक्षण देणे हे अतिशय निष्ठेने, प्रमाणिकपणे आणि संपूर्णपणे झोकून देऊन केले पाहिजे, शरीर व मन यांचा समतोल अनेक कारणांमुळे बिघडण्याची शक्यता असते. हा समतोल राखण्यासाठी प्रत्येक वव्यकक्तीने स्वताचे असे तंत्र शोधून काढले पाहिजे कि ज्यामुळे तो चिंतामृत होईल, विरंगुळा शोधण्याची सवय त्याला लागेल. हि अंत:दृष्टी प्रत्येक व्यक्तीजवळ असेतच, फक्त या शक्तीची त्याला जाणीव नसते. हि जाणीव निर्माण झाली आणि त्या शक्तीचा वापर प्रत्येक व्यक्ती करू लागली कि शरीर-मन यांचा समतोल व संतुलन चांगले राहू शकते. यासाठी खालील पद्धती अमलात आणू शकता.
१) शरीराचे लक्ष घा :=
प्रत्येक व्यक्तीच्या मनात बालपण हे असतेच. वृद्धत्व म्हणजे तर दुसरे बालपणच. लहान मुलांना ज्याप्रमाणे शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर दुसरेच बालपण. लहान मुलांना ज्याप्रमाणे शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्याकडे घरातील वडिलधाऱ्यानी लक्ष घ्यावे असे वाटत असते. त्याचप्रमाणे कोणत्याही वयातील स्त्री-पुरुषांना आपल्या शरीराकडे लक्ष घ्यावे असे वाटत असते. मोठेपणी दुसरे कोणी तुमच्या शरीराकडे बघण्यापेक्षा तुम्हीच त्याकडे पहिले पाहिजे.
२) मन एकाग्र करणे:=
मन सहजपणे आणि कोणत्याही प्रकारचा तान न पडता एकाग्र व्हायला पाहिजे. यासाठी मनावर नियंत्रण मिळवून त्याला योग्य ते संदेश देण्याचे काम बुद्धीने केले पाहिजे. आपल्या मनाला कुठल्याही गोष्टीस प्राधान्य घायचे त्याची सातत्याने सवय लावली पाहिजे. ज्या गोष्टीना आपण प्राधान्य देऊ त्याचप्रमाणे गरजा बदलत जातात. किंबहुना ज्या मुलभूत व आवश्यक गरजाच आहेत त्यांनाच आपण प्राधान्य दिले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीला आवश्यकता असते प्रेमाची, आपुलकीची, थोड्याशा सहानुभूतीची एकमेकांना समजून घेण्याची, थोड्याशा प्रोत्साहनाची आणि मानसिक आधाराची आणि चरितार्थ सहजपणे चालवू शकेल एवढ्या पैशांची. या किमान गरजांवर प्रत्येक व्यक्तीने लक्ष केंद्रित केले तर त्याला जीवनात फारसे दुख होणार नाही. पण प्रत्येक व्यक्तीचा मनातील अतिमहत्वाकांक्षा, पैशांसाठी प्रचंड लोभी वृत्ती, मोठमोठी उदिष्टे यामुळे त्याचे मन भलत्याच गोष्टीवर केंद्रित होते. त्यांचा अहंकार बळावतो, आणि त्याचे जीवनातील हेतू व प्राधान्य बदलून जाते आणि त अवाजवी व अनावश्यक गोष्टींवर मन एकाग्र करू लागतो आणि हे प्राप्त झाले नाही तर मन उदास होते. दुखी होते.
आयुष्यात आनंद कशात आहे, समाधान कशात आहे हे समजून घेण्याची ज्यांच्या मनाची कुवत नाही ते ‘वृद्ध ‘ होऊनही म्हातारेच राहिले असे म्हटले पहिजे. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे प्रत्येक अनुभवांकडे त्रयस्थेपणे पाहायला शिकले पाहिजे. जे घडते आहे, ते घडणार आहे, त्यात मी डोकावल्यामुळे किंवा हस्तक्षेप केल्यामुळे ते बदलेलच असे नाही, मग जे घडणार आहे. ते तसेच घडू देण्यात आणि जे घडेल ते मान्य करण्यात खरे सुख आहे. वृद्धत्व हा सुद्धा एक अनुभव आहे. हा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. असे समजून वृद्धत्वाकडे पहिले तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वृध्पानीही तुम्ही अधिक सामर्थ्यवान व्हाल.
स्थितप्रज्ञता प्राप्त होणे हे तुमच्या आयुष्यातील ध्येय असेल पाहिजे. तुम्ही वृद्ध झालात म्हणजे तुम्हाला स्थित राहण्याची प्रज्ञा प्राप्त झाल असे समजू नका. स्थितप्रज्ञता प्राप्त होण्यास प्रत्येक व्यक्तीला एक अंर्तबुद्धी असते. त्या बुद्धीचा उपयोग करूनच स्थितप्रज्ञता प्राप्त होऊ शकते.
जीवनाकडे बघण्यास दृष्टीकोन असाच ठेवला तर वृद्धत्व म्हणजे दुख, वृद्धत्व म्हणजे नैराश्य असेन वाटता वृद्धत्व आपला मित्र आहे. वृद्धत्व म्हणजे जाणीव, वृद्धत्व म्हणजे सर्जनशीलता, वृद्धत्व म्हणजे विकास हे तुम्हाला पटेल आणि वृद्धपणी सुद्धा तुम्ही तरून राहाल. वृद्धत्व हे शत्रूप्रमाणे न वाटता मित्राप्रमाणे वाटू लागेल….