मधुर मध




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Delicious Honey: Super-Sweet honey has a wealth of health benefits. Honey helps with coughs, particularly buckwheat honey. In a study of 110 children, a single dose of buckwheat honey was just as effective as a single dose of dextromethorphan in relieving nocturnal cough and allowing proper sleep. Read health benefits of Honey…

honey    मध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. आग्या  मोहोळाचा मध शास्त्रोक बी हंटिंग पद्धतीने गोळा केला  जातो. सातेरी व इटालियन मेलीफेरा जातीच्या  मधमाश्याचे पालन करून मध केला जातो. मधमाशा  पालन व्यवसाय हा मेंढपालांसारखा भटका उद्योग  आहे. मेंढपाळ जसे चाऱ्यासाठी मेंढ्याचे स्थलांतर  करीत असतात. तसे मधपाळणा सुद्धा विविध  विभागातील व कालावधीतील विविध फुलोऱ्यांचा  विभागात मधमाश्यांचे स्थलांतर करून मधाचे  उत्पादन घ्यावे लागते. ग्राहकांना विविध प्रकारच्या  फुलोऱ्याच्या मधयुनिफ्लोरस प्रकारात मिळतात.
उदा. मोहरी, निलगिरी, सुर्यफुल, जांभूळ, हिरडा- इत्यादी. उगम फुलानुसार मधास वेगवेगळे रंग व चवी असतात आणि त्यांचे औषधी गुणधर्म हि वेगवेगळे असतात. नॅचरल मल्टीफ्लोरल मधाच्या प्रकारात दोन-तीन फुलोऱ्यांचा मध एकत्र करून भरलेला असतो. अस्सल कच्चा मधावर सेंटिफ्युजन व्हॅक्युम फिल्टरेशनच्या तंत्रज्ञानानुसार फिल्टरेशन रिडक्शन व पाश्चरायझेशन प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया करीत असतात ५५ अंश तापमानव प्रक्रियेचा कालावधी ३५ मिनिटे याबाबी कटाक्षाने पाळ्या जातात. यामुळे मधातील मधमाशांची पाचक द्रव्ये व जिवनसत्वरुपी इतर घटक यांचेवर विपरीत परिणाम होऊन देता मधावर निकष लावले जातात. निर्यात प्रधान गुंवातेचा मध भारतीय ग्राहकांना सुद्धा उपलब्ध आहे. अस्सल मधाबद्दल भारतीय ग्राहकांच्या व वैधांच्या काही गैरसमजुती आहेत.

प्रशन१) = अस्सल मध म्हणजे काय? वत्याचे गुणधर्म कोणते?
उतर:=मधमाशांच्या वसाहतीतील काम करी मधमाशा घरातून ( पोळ्यातून) अत्र गोळा करण्यासाठी बाहेर पडतात व पाच पंचवीस फ्लामधून मकरंद तसेच पराग गोळा करतात. मकरंद व परागाचा पुरेसा साठा मिळाल्यानंतर घरी परततात व पोळ्यातील षटकोनी आकाराच्या कोठीत मकरंद व पराग साठवितात. यावेळी मकरंदामध्ये मधमाशाचे पाचक द्रव्ये मिसळे जाते. या पाचक द्रव्यांची सुक्रोज रुपी मकरंदावर प्रक्रिया होऊन त्याचे रुपांतर ग्लुकोट, फ्रुक्टोज, डेकट्रोज, लेव्हुलोज रुपी शारीरिक साखरेत केले जाते. या शारीरिक साखरूपी पदार्थास मध असे संबोधले जाते आणि म्हणूनच शास्त्रीय भाषेत मकरंद व मध हे वेगवेगळे शब्द वापरले जातात. थोडक्यात मध म्हणजे मधमाशांनी पचविलेली नैसर्गिक साखर होय. मकरंदाच्या उगम फुलानुसार मधास वेगवेगळे रंग, चवी, वसुवास, असतात. मध हे एक कार्बोहायड्रेटस, प्रोटीन्स, अमिनोअसिड्स, मिनरल्स, व व्हीटामीन्स असलेले नैसर्गिक पौष्टीक अत्र आहे. मध म्हणजे निसर्गाने मानवाच्या निरोगी, शक्तीदायक, उत्साही व आरोग्यासाठी प्रदान केलेली एक सुवर्ण भेटवस्तूच होय.

प्रश्न२)=अस्सल मधाची परीक्षा कशी केली जाते ? सर्वसाधारपणे बाजारातील अस्सल मध कसा ओळखावा?
उतर- एकमार्कनुसार तसेच निर्यातीसाठी आवश्यक अशा निकषांची प्रयोगशाळेत मधाची परीक्षा घेतली जाते. प्रयोगशाळेत मधाच्या स्पेसिफिक ग्रॅव्हीटी, टोटल रिड्युसिंग शुगर, सुक्रोज, फ्रूटोज, ग्लुकोज रेशो, अॅश अॅसिडिटी व फिश टेस्ट या प्रकारच्या चाचण्या घेतल्या  जातात. या चाचण्यांच्या निकषानुसार मधाची गुनवता ठरविण्यात येते. निर्यातीसाठी मधातील मधमाशांचे पाचक द्रव्य व क्ष-किरणाद्वारा घेतली जाणारी चाचणी या चाचण्यांच्या निकषानुसार मधाची गुनवता ठरविण्यात येते.
बाजारात मधुनावाने साखरेच्या पाकाचे आयुर्वेदिक लायसन्स घेऊन साखरेचा पाक पॅक रून हि वस्तू मध म्हणून खुलेआम विकली जाते .काही कंपन्या कुत्रिम मधज्याला ग्लोरी असे संबोधले जाते. पॅककरून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. ग्लोरी मध म्हणजे बायोटेक्नॉलॉजिच्या तंत्राद्वारा साखरेच्या पाकात बॅक्टेरिया मिसळले जातात. हेबॅक्टेरिया साखर खाउन पाचक द्रव्ये तसेच शुगर तयार करतात. यालाच मध सदृश ग्लोरी असे संबोधले जाते. हा कुत्रिम मध चीनमधून आयात केला जातो. हा मध एगमार्कच्या निकषांमध्ये सहजगत्य उतीर्ण होतो. या उत्पादना मध्ये विक्रेत्यांना भरम साठक मिशन मिळत असल्याने तसेच अस्सल माधाविश्यीच्या त्यांच्या अज्ञानामुळेही उत्पादने त्यांच्या द्वारा ग्राहकांच्या गळी उतर विली जातात.
पुरातन काळी आयुर्वेदात मधाच्या परीक्षे साठी काही अनुमानावर आधारित निकष सांगितले आहेत. त्याला कोणताही शास्त्रीय आधारनाही. जसे कि, पाण्यात मध टाकला असतातोन विरघळता तळा शीजातो . भाकरीला मध चोपडून दिला असता कुत्रा ती भाकर खातनाही इत्यादी…
जसे बाजारातील गाई चे तूप, म्हशीचे तूप व डालडा तूप यांचा निवाडा ग्राहक स्वादानुसार सहजगत्या करतात. तसेमधा विषयी सुद्धा निवाडा करता येणे सहज शक्य आहे. यासाठी ग्राहकांनी मध म्हणजे मधमाशांनी पचविलेलि नैसर्गिक साखर असून, त्याला उगम फुलानुसार वेगवेगळे रंग, चवी व सुवास असतात हिबाबल क्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच मध हा चवीने मधुर असतो. गोड नसतो. मधाच्या उत्पादनाचे प्रमाण पूणर्त: उत्पादन कालावधीत हवामानावर अवलंबून असल्याने प्रत्येक सिझनमधील मधाचीउ त्पादन किंमतही वेगवेगळी असते. अस्सल मध चाखला असता त्याचा जिभे वरील गोडवा १५ सेकंदात नष्ट होते. तसेच त्याला उगम फुलानुसार वेगवेगळी भावना असते. भेसळयुक्त मधाचा गोडवा जिभेवर १५ मिनिटे टिकून राहतो, तर यामधाससाखर आंबा अथवा गुळांब्याची चव असते. अस्सल मधास वेगवेगळे रंग व चवी असतात.

प्रशन३) :- स्फटीकिभवन होणारा मध भेसळयुक्त असतो काय ? नसल्यास त्याचे कारण काय?
उतर:- नारळाचे तेल तसेच साजूक तूप यांच्यामध्ये मधाचेही नैसर्गिकरित्या स्फटीकिभवन होते. पावसाळा व हिवाळा या कालावधीत गोळा होणाऱ्या मधांचे जलद अथवा सावकाश स्फटीकिभवन होते.

उदा.माहेरी, निलगिरी, सुर्यफुल इत्यादी काही मधाचे जलदव पूर्णपणे तर काही मधाचे सावकाश ववअपुर्ण पणे स्फटीकिभवन होते.स्फटीकिभवन होणाऱ्या मध भेसळयुक्त असतो हि गैरसमजूत आहे. मधाच्या या प्रक्रीये बाबत शास्त्र शाखेत न शिकलेल्या व्यक्तीकडूनच मधाची साखर झाली असा चुकीचा वाक्यप्रचार वापरला जातो. मध म्हणजे नैसर्गिक, शारीरिक साखरेचे तीव्र मिश्रण असल्याने त्याचे स्फटीकिभवन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिवाळ्याच्या कालावधीत गोळा केला जाणारा मध, कमी तापमानामुळे व शुद्ध हवामानामुळे सर्वोत्तम गुंवातेचा असतो. परंतु या मधाचे जलद स्फटीकिभवन होते. भारत देशात उत्पादित होणाऱ्या एकूण मधापैकी ८० टक्के मधाची निर्यात होय असते. स्फटीकिभवन होणाऱ्या मधास परदेशात मोठी मागणी आहे. मधाच्या स्फटीकिभवनाबाबत भारतीय ग्राहकांच्या गैरसमजूतिचे निराकरण करत बसण्यापेक्षा भेसळयुक्त मधु अथवा बायो टेक्नोलॉजिकल मधसदृश ग्लोरी, ज्याचे स्फटीकिभवन होत नाही असा मध विकण्याकडेच बहुतेक कंपन्याचा कल असतो. तसेच हि बाब भरपूर नफा कमविण्यासाठी संबंधिताच्या फायघाचीच आहे.स्फटीकिभवन होणाऱ्या मधास गरम पाण्यात अथवा सूर्यप्रकाशात ठेवल्यास तो परत द्रव्यरूप होतो. शक्यतो स्फटीकिभवन झालेला मध जसा आहे तसा जाम सारखा सेवन करावा. कारण उष्णता दिल्याने मधाची गुनवता खालावते. घट्ट झालेला मध जॅम सारखा पोळीला अथवा ब्रेडला लावून खावयाचा असल्यास मधाचे पॅक फ्रीजमध्ये ठेवावे व स्फटीकिभवन झालेल्या मधाचा आनंद उपभोगावा.

प्रश्न ४):= दैंनदिन जीवनात विविध कारणांसाठी मधाचा वापर कसा करावा.
उतर:- मधाच्या नित्य सेवनाने मानवी शरीरास आवश्यक अशा जीवनसत्वांचा सहजगत्या पुरवठा होतो. तसेच मधातील प्रतिकारक वाढविण्यास मदत करणाऱ्या घटकांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मधाचा वापर अॅन्टी बायोटीक किंवा अॅन्टीसेप्टिक म्हणुनी करता येतो.
१) आयुर्वेदात औषधांचा त्वरित परिणाम व्हावा म्हणून अनुपान रूपाने मधाचा वापर करावयास सांगतात. तर औषधांचा परिणाम सावकाश व्हावा यासाठी तूप अथवा दुध अनुपान म्हणून वापरण्यास सांगतात. मधातून औषधे घेतल्याने त्याचा योग्य परिणाम न झाल्याने आपण वैघास दोष देत बसतो.
२) मध म्हणजे मधमाशांनी पचविलेलि नैसर्गिक साखर असल्याने डायबेटीस पेशंटनेसुद्धा मधाचा वापर नित्य आहारातील पूरक अत्र म्ह्णून कार्व्यास काहीही हरकत नाही. उगम फुलानुसार उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या युनिफ़्लोरल मधाचा वापर विविध रोग्यांच्या औषध रचनेबरोबर पूरक आहार म्हणून वापर करण्यास काहीही हरकत नाही.
उदा. मोहरीचा मध, ह्दय विकारावर्ती निलगिरीचा मध सर्दी- खोकल्यासाठी तर गेळ- हिरडा मध सांधेदुखी व जांभूळ मध डायबेटीससाठी अत्यंत उपयुक्त आहे. शक्तीवर्धक म्हणून नॅचरल. मल्टीफ़्लोरस प्रकारचा मध वापरावा. दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी. २ चमचे मध मिसळून नियमित घ्यावा. अॅसिडिटी होत नसल्यास १/२ लिंबाचा रस वापरावयास हरकत नाही.
३) डांएटीगद्वरा शरीराचे वजन कमी करत असताना मधच्या लिंबू सरबताचा पूरक अत्र म्हणून वापर करावा. यामुळे डायेटीगमुळे होणारा थकवा जाणवत नाही. कारण मध म्हणजे स्निग्ध पदार्थ विरहीत शारीरिक शक्ती व जीवनसत्व पुरविणारा अनमोल असा नैसर्गिक परिपूर्ण आहार होय.
४) आजारी पेशंटच्या शरीराची झीज भरून काढता यावी यासाठी साखरेऎवजी मध वापरून फ्रुट सॅलड बनवून पेशंटना किमान दोन वेळा खावयास घ्यावे.
५) दुग्ध, तूप, मध, शर्करा व दही यांचे पंचामुर्त स्वादासाठी इलायची व तूळशिंची पाने मिसळून सकाळ – संध्याकाळ भोजनवेळी नित्य सेवन करावे. नित्याच्या भोजन प्रसंगी पोळी अथवा ब्रेड बरोबर मधाचा वापर जाम सारखा करावा. यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी शक्तीदायक, उत्साही व स्फूर्तीदायक राहण्यास निश्चित मदत होईल यात शंका नाही.
निसर्गाने मानवास प्रदान केलेल्या मधासारख्या अमृताचे उत्पादन भारत देशात मोठ्या प्रमाणात होऊनही त्याचा उपभोग मात्र विदेशातील ग्राहक करीत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या मानवी आरोग्यास व निसर्गास हानिकारक अशी उत्पादने आकर्षक पॅकेजिंग व भ्रामक जाहिरात करून खुलेआमपणे विकत असतात.
तरी भारतीय ग्राहकांनी बाजारातील उत्पादनाच्या गुनवता तसेच उपयुक्तेबाबत जागरूक राहून किरकोळ विक्रेते तसेच मालवाले ग्राहकाभिमुक सेवा देतात कि नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार सव्देशी कंपन्याना सुद्धा त्यांच्या कार्य पद्धतीत बदल करणे कर्मप्राप्त आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu