चिरतरुण मन
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Young Mind, Although the body is getting old and do not mind getting old.I was me , but no matter how old you are (mind) and will have the power to extend,If you say it takes to increase your confidence and get the control center of your brain , and you will receive more power .

old_couples_still_love_04शरीर म्हातारे होत असेल तरी मन कधी म्हातारे होत नाही. तुम्ही कितीही वयस्कर झाला असलात तरी मला माझ्यातील (मन) शक्ती आणि जोम वाढवायचा आहे, असे म्हणू लागतात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मेंदूतील काही केंद्रावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल आणि तुम्हाला अधिक शक्ती प्राप्त होईल.

शरीरातील भावभावांचा आपल्या बुद्धीशी जसा संबंध आहे तसाच या भावभावनांमुळे शरीरातील संप्रेरकांच्या समतोलावरही त्याचा परिणाम होतो. भावनांशिवाय संप्रेरकाच्या निमितीशिवाय भावना उत्पन होत नाहीत. त्याचप्रमाणे शरीरात उत्पन होणार्या वेदना या मज्जातंतुला संदेश मिळाल्याशिवाय उत्पन होत नाहीत. या संदेशांना अडथळा आणणारे हे संप्रेरक निर्माण झाल्याशिवाय वेदनांपासून मुक्ती मिळत नाही. थोडक्यात आपले शरीर हे अशा अनेक गुंतागुंतीच्या यंत्रणेने एकमेकांशी जोडलेले असते. शरीर व मन हे सुद्धा एकच आहेत. त्यांच्यात एक अतूट धागा असतो. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या मनात विचार यायला लागले कि शरीरात विशिष्ट रसायनांची निर्मिती व्हायला लागते. या क्रिया नकळपणे होत असल्या तरी हे समजून घेण्याची शएक्कती प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असते. हि शक्ती आपण समजून तिचा योग्य वापर केला तर प्रत्येक माणूस शक्तिवान होईल.

प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर त्याला शारीरिक आजार होणे हे अवलंबून असते. सतत मानसिक ताणतणावाखाली एखादी व्यक्ती जगत असेल तर तिला कन्सर होण्याची शक्यता असते किंवा एखादी व्यक्ती सतत विषण्ण मनस्थितीत असले तर त्या व्यक्तीला शारीरिक आजार उदभवण्याची शक्यता चार पटींनी जास्त असते. कारण सतत मानसिक तणावाखाली राहिल्यामुळे शरीरात जैव रासायनिक बदल होतात आणि त्यामुळे शारीरिक आजार होऊ शकतात. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे. याबाबत जगात अनेक प्रकारे अभ्यास केला आहे. नैराश्य व उदिग्नता हे अनेक शारीरिक आजारांचे प्रमुख कारण आहे.

आपण नेहमीच्या व्यवहारात पाहतो कि काही माणसे फार सहनशील असतात तर काहींना थोड्याशा वेदनाही सहन होऊ शकत नाहीत. दोन ह्दयविकारांचे रुग्णही आपल्या वेदना या वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतात. त्या सहन करण्याची त्यांची क्षमता वेगवेगळी असते. हदयविकार आहे असे समजूनही त्याला धैर्याने तोंड देतात आणि त्यामुळे आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतात. असे का होते ? तर आजाराकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा आहे, त्त्यावर ते असते. ह्रदयविकार झाला कि वास्तवता आहे. त्यात तुम्ही बदल करू शकत नाही. पण या वास्तवतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर तुमचे मनोबल वाढते आणि तुम्ही ह्रदयविकाराचा बाऊ करत नाही. प्रत्येकात असलेल्या या मनशक्तीचा वापर उपचारांत करावा असा नवा विचार लोकांच्या मनावर बिबवण्याची जरुरी आहे. मनोबल चांगले असेल तर शारीरिक वेदनांवरही तुम्ही मत करू शकता.
‘मन’ च शरीरावर सतत नियंत्रण करीत असते पण आपण सर्व जन सतत आपल्या दृश्य भागाचा म्हणजेच देहाचा विचार करीत असतो. ‘अंदर झाक कर ‘ बघण्याची सवया आपण आपल्याला लावत नाही. शरीरावर मन उपचार करत असते हि वस्तुस्थिती आहे आणि कुठल्याही पॅथीपेक्षा ही उपचारपद्धती अतिशय सुयोग्य, पवित्र व नैसर्गिक आहे पण या मानसोपचार पद्धतीकडे लक्ष घायला आज कोणाकडे सवड नाही.

    ‘मन’ हे अदृश्य असल्यामुळे त्याचा कोणी विचार करीत नाही. शरीरावर मन आणि मनावर बुद्धी नियंत्रण करीत असते. माणसाला असलेल्या या बुद्धीचा वापर आपण करीत नाही. बुद्धीने मनाला योग्य सूचना दिल्या, तर त्याप्रमाणे शरीरात अनुकूल जैवरासायनिक बदल होऊ शकतात. औषधे ही दुय्यम असतात. किंबहुना तुमच्या मनाचा समतोल ढळला असेल तर औषधांचाही उपयोग होऊ शकत नाही.
यासाठी बुद्धीचा वापर करून मनाला घडविणे हे अत्यंत महत्वाचे असते. मनावर सातत्याने अशा संस्काराची जरुरी असते. बरे होणे हा तुमचा हेतू आहे हे बुद्धीने मनाला सातत्याने सांगितले पाहिजे. म्हणजे मग मन ते मानायला तयार होते आणि त्याप्रमाणे शरीरावर ते उपचार करू शकते. शरीरात घडणाऱ्या अनेक अनैसर्गिक क्रियांवर आपले नियंत्रण नसते अशी आपली समजूत आहे. पण आपले मन सतत जागरूक ठेवले तर अनैसर्गिक क्रियांवरही आपण नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी सातत्याने मन जागरूक स्थितीत ठेवण्याचा सराव केला गेला पाहिजे. मानसिक व्यायामाने मन जागृत ठेवता येऊ शकते. हे तंत्र प्रत्येक वव्यक्क्तीने विकसित केले पाहिजे.

शरीर म्हातारे होत असेल तरी मन कधी म्हातारे होत नाही. तुम्ही कितीही वयस्कर झाला असलात तरी मला माझ्यातील (मन) शक्ती आणि जोम वाढवायचा आहे, असे म्हणू लागलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मेंदूतील काही केंद्रावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल आणि तुम्हला अधिक शक्ती प्राप्त होईल. या उलट आता काय मी म्हातारा झालो आहे आणि अधिक म्हातारा होत राहणार आहे. असे जर तुम्ही समजू लागलात तर तुम्ही तुमचा पराभव मान्य केला आहे. किंबहुना असा विचार करण्यामुळे तुम्ही स्वत:च घोषित केला आहे असे होईल.
मनाची शक्ती कुठल्याही वयात आपण जागृत करू शकतो. म्हातारपण हेही त्याला अपवाद नाही. तुमच्या मनाची घडण जर तुम्ही योग्य पद्धतीने विकसित केलात तर तुमच्यातील जोम व शक्ती कायम राहून तुम्ही कायम जोमदार व्यक्ती म्हणून राहू शकाल. यासाठी जरुरी आहे ती बुद्धी, मन आणि शरीर हे एकच आहे. ते अविभक्त आहे हे, मान्य करा. मन सतत उत्साहित, प्रफुलीत राहील, असेच ध्येय ठेवलेत तर तुम्ही म्हातारे होणार नाही

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d