Tomato Pulao
Tomato Pulao, is an easy and yummy lunch box recipe especially for kids. This is a veg recipe with lots of ingredients. It haldly take 15 minutes to prepare. Kids will surely like this as this has less spice and more tasty.
साहित्य -: एक वाटी तांदूळ, एक टी, स्पून तूप, एक वाटी काजू तुकडे आणि बेदाणे, एक वाटी गाजराचे तुकडे, एक चमचा आले-लसूनपेस्ट, अर्धी वाटी टोमाटोप्युरी, थोडे टोमाटो केचप, थोडा तमाल पत्री, तीन लवंग, थोडी दालचिनी, साजूक तूप. एक चमचा मिरची पावडर, कांदा कापून तळलेला. चवी नुसार मीठ.
कृती -: तांदूळ एक तास पूर्वी धुवून ठेवा. टोमाटो प्युरी प्रथमच तयार करून ठेवावी. (टोमाटो पाण्यात किंचित उकळून नंतर त्याची साल काढून मिक्सर मधून काढून घ्या. ) दोन कांदे पातळ चिरून तेलात तळून घ्या. आणि काजूचे तुकडे व बेदाणे सुद्धा तळून घ्या. गाजराच्या फोडी किंचित पाण्यात वाफवून घ्या. उरलेल्या गरम तेलात, सर्व मसाला टाकून व तांदूळ घालून नंतर आले-लसून पेस्ट, तिखट, चवी नुसार मीठ घालून परतावे व शिजण्या करीता गरम पाणी घालावे अर्धवट भात शिजत आला कि त्यात टोमाटो प्युरी, केचप आणि तळलेले काजू, बेदाणे व गाजर तुकडे घालावे व चांगली वाफ येउन भात शिजू द्यावा. पुलाव वाढताना त्यात व तळलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून द्यावी.