A simple tomato sauce with lots of flavour is perfect for spaghetti and meatballs. A weeknight classic. This is designed to be a low cost recipe. I love—I mean love—making spaghetti and meatballs. Oh, don’t get me wrong—I love eating it, too. But if I had to choose forever between …
साहित्य -: २०० ग्राम स्प्यगेटी पॉकीट, १पाव खिमा, १ चमचा आले- लसून पेस्ट, १/२ चमचा हळद. १ चमचा मिरची पावडर,१/२ चमचा मटन मसाला, एक मोठा कांदा, दोन मोठे टमाटे, १ अंडा, १ चमचा मैदा, २ चमचे लोणी, २ चमचे तेल, १/२ चमचा मिरेपूड, चवी नुसार मीठ.
कृती -: स्प्यगेटी किंचित मीठ घातलेल्या पाण्यात १५ ते २० मिनिटे शिजवावी व चाळणीवर काढून ठेवावी. नंतर त्याला १ चमचा लोणी लावून ठेवावे, खिमा धुवून कोरडा करावा त्याला आले-लसून पेस्ट लावून ठेवावी. कांदा ते गरम करून तेलात परतून घ्यावा त्यात खिमा घालावा व नंतर सर्व मसाले घालून खिमा मोकळा शिजवून घ्यावा. अंडा छान फेटून घ्यावा, खिमा शिजून थंड झाला कि त्यात अंडा मिसळून घ्यावा व नंतर त्या खिमाचे लिंबा एवढे गोळे करावेत. व ते तेलात तळून घ्यावे.
टोमाटो थड्या गरम पाण्यात वाफवून नंतर त्याची साल काढून त्याचा बलक करून घ्यावा. एक चमचा मैदा थोड्या पाण्यात मिसळून बलक व पातळ केलेला मैदा एकत्रित करावा त्यात मिरे पूड व किंचित मीठ घालून त्याचा घट्ट सर सॉस करून घ्यावा. नंतर एका बेकिंग डिशला लोणी लावावे त्यात शिजवलेली स्प्यगेटी सारखी लावावी वर तयार केलेले मीट बॉल्स लावावे त्यावरून सॉस घालावा, वरून उरलेले लोणी लावावे व ती बेकिंग डिश ओव्हन मध्ये मध्यम तापमानावर १५ ते २० मिनिट बेक करावी.