Skin Disorders And Diet Natural skin care is the care of the skin using naturally derived ingredients (such as herbs, roots, essential oils and flowers) combined with naturally occurring …
त्वचा ही आरोग्याचा आरसा असते. निरोगी त्वचेचे रहस्य हे नुसत्या साबण आणि क्रीमच्या वापरावर अवलंबून नसून आपण जे खातो, व्यायाम करतो आणि सभोवतालचे वातावरणात ज्यात राहतो, वावरतो आणि काम करतो त्यावर सुद्धा अवलंबून असते.
जसे चांगले कापड घालणे व टापटीप दिसणे महत्वाचे असते तसेच आपल्या त्वचेची काळजी घेणे आणि त्याचे आरोग्य राखणे गरजेचे आहे. त्वचा हि आरोग्याचा आरसा असते. निरोगी त्वचेचे रहस्य हे नुसत्या साबण आणि क्रीमच्या वापरावर अवलंबून नसून आपण जे खातो, व्यायाम करतो आणि सभोतालचे वातावरण ज्यात राहतो, वावरतो आणि काम करतो त्यावर सुद्धा अवलंबून असते. खूप वर्षापासून अन पदार्थांचा (फळांचा गर, रस, अंडी, काकडी, तेल; दही, मध, इत्यादी) उपयोग चेहरा तजेलदार दिसण्यासाठी केला जातो. हया सोबत योग्य आहाराची जोड दिल्यास त्याचा जास्त परिणाम दिसून येतो. काही संशोधनान मधून असे आढळते आहे कि आपल्या अनामध्ये असे काही घटक आहेत जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. त्यापेकी काही घटकाची थोडक्यात माहिती…
१) अँन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थ:=
स्त्रोत-संत्री, गाजर, टोमॅटो, ब्रोकली हिरव्या पालेभाज्या, काळी द्राक्षे
उपयोग- त्वचेचा टवटवीतपणा ओलसरपणा राखणे, त्वचा निरोगी ठेवणे, चेहऱ्यावरील फोड व मुरुमावर, पुरळ ताबा ठेवणे.
काळी द्राक्षे :=
द्राक्षे द्राक्षांमधील बियांमध्ये नैसर्गिक अँन्टीहिस्टमिन असते. त्वचेची अँलर्जी व होणारी आग, जवळजवळ कमी करण्यात मदत करते.
बीट-बीटामध्ये त्वचेचे आरोग्य चांगल राखण्यासाठी लागणारे अ’ ई जीवनसत्व, पोटाशीयाम, कल्शियम, सोडियम आणि मग्रेशियम हे अधिक प्रमाणात आढळतो. बीटामध्ये त्वचा स्वच्छ व तजेलदार ठेवण्याचा गुणधर्म असतो बीटाचा उपयोग रक्तामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो व झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी होतो.
बीट शरीरातील विषारी द्रव्य कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
ग्रीन टी- ग्रीनटीमध्ये पोलिफीनोल्स असल्यामुळे रोज नियमितपणे घेतल्यास त्वचा सुंदर होते व कांती नितळ बनते.
डाळिंब- डाळींबातील पोलिफीनोल्स रक्तातील दोष कमी करून रक्त्तप्रवाह सुधारतात. त्वचेला योग्य रक्त्तपुरवठा झाल्याने त्वचाविकार होण्याची शक्यता कमी होतो.
२) ई आणि क जीवनसत्व -(तळीराळ्प ए रपव उ )
स्त्रोत-(ई जीवनसत्व) -ब्रोकली, सुकामेवा, ओलिव आईल, बदामस्त्रोत (क जीवनसत्व) टोमॅटो, आवळा, संत्री, लिंबू, पपई
उपयोग- त्वचा घट ठेवण्यास व त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.
टोमॅटो, -टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे रंगद्रव्य असते जे रक्त्त लाल ठेवते व रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यास मदत करते.
ब्रोकली- ब्रोकलीमधील अ ब क ई, के जीवनसत्वे, ओमेगा ३ फटी असिड कल्शियम फोलेट हे त्वचेचा पेशीचे कार्य व्यवसंथित ठेवण्यास व जखमा भरून काढण्यास मदत करतात.
३) सेलेनियम:-
स्त्रोत- व्हीट जर्म, दुणा मासा, लसुन, अंडी, ब्राऊन राईस बदाम.
उपयोग- सेलेनियम पांढर्या रक्त्तपेशी वाढवण्यास आणि प्रतिकार शकती वाढवण्यास मदत करते. त्वचेचे कार्य व्यवस्थित राखण्यासाठी मदत करते.
सिलेनियामची शरीरात कमतरता असल्यास त्वचेचे विकार व मुरूम होतात.
४) ओमेगा-३ फँटीं असिड
स्त्रोत- मासे, आक्रोड, जवस, सूर्यफुलाची बी, बदाम
उपयोग- ओमेगा- ३ त्वचेच्या सुरकुत्या मुरूम आणि सूर्यप्रकशामुळे होणारे विकार जसे कि त्वचा लाल होणे, काळी पडणे, जळजळणे इत्यादी कमी करण्यास मदत करते.
५) पाणी:-
स्त्रोत- पाणी फळांचा/भाज्यांचा रस, नारळपाणी
उपयोग- पाण्यामुळे त्वचा स्वच्छ व निरोगी राहते. पाणी हानिकारक पदार्थाना बाहेर काढण्यास मदत करते. भरपूर पाणी पिल्यामुळे त्वचा तजेलदार आणि ओलसर रहातो. त्यामुळे दिवसातून कमीतकमी ८ ग्लास पाणी प्यावे.
निरोगी त्वचेसाठी आहार आणि वजनाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले अन्य पदार्थ ब्रेड, स्निग्ध पदार्थाचे, गोड पदार्थाचे अति सेवन तसेच कमी फाईबर आणि फळ व भाज्यांचा जेवणात समावेस न करणारे ह्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतात. म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे याची सांगड घालणे त्वचेचा आरोग्याकरिता आवश्यक आहे ………….