Saffron Pulao
Saffron Pulao is prepared on special occasions in India. It’s aroma makes you want to eat it, even more.. Read the method and make it your own. get complete recipe from Marathi unlimited.
साहित्य-: एक वाटी बासमती तांदूळ, अर्धा वाटी तूप, चार लवंगा, दोन दालचिनी तुकडे, ७ काळी मिरी, २ मोठी विलायची, 3 हिरवी वेलची, तमाल पत्र २, चिमुट भर हिंग, दोन कप नारळाचे दुध (साधेही) केशर २ चमचे, दूधाच मसाला, मीठ, पाणी.
कृती -: जाड बुड असलेले भांडे त्यात तूप टाकून गरम करा त्यात हिंग व सर्व मसाला टाकून फोडणी द्यावी हिरवी वेलची फोडून घ्यावी पण त्यातील दाणे बाहेर नकाढता फोडणीत टाकावी. नंतर एक तास धुवून ठेवलेले तांदूळ घालावे व गुलाबी होईस्तोवर परतून घ्यावे. नंतर दुध व दुधाचा मसाला व चवीनुसार मीठ घालावे. व थोडे गरम पाणी ओतावे व भात अर्धवट शिजू द्यावा, भातात थोडे पाणी असतानाच नंतर केशरएक कप दुधात मिसळून एक जीव करून त्या भातात ओतून सर्व बाजूने मिक्स करावे. त्यात थोडे तूप सोडावे त्याने भात मोकळा होतो व रुचकर वाटतो नंतर मंद आचेवर भात परत मोकळा शिजू द्यावा. रस्सेदार भाजी सोबत हा वाढावा. याला केशरी रंग येतो, काजू व बेदाणा घालून सजवावा.