नैसर्गिक बदल वृद्धपणा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

All events will take what action the body . Every man or beliefs, traditions , depends on trust and expectations. In addition , each person has his own image of how . Should try to understand it . This consciousness is the result niscitapana activity in the body.I do not think there were too many patients without drug ghayace example , if a particular doctor . He is not the solution . This is because they trust that the patient and the doctor . This trust and gain confidence in the doctor .

collaboration-300x225

तुम्ही म्हातारे झाले आहात असे समजू लागलाच म्हणजे  शरीरात पण त्या प्रमाणेच क्रिया घडू लागलात.  म्हातारपणा हा  नैसर्गिकरित्या होणारा शारीरिक बदल असला तरी त्याची तुम्हाला  जाणीव होण्यामुळेच तुम्ही म्हातारे होता. शरीरातील सर्व घटना क्रिया कशा होतील. या प्रत्येक माणसाची  श्रद्धा, समजूत, विश्वास व अपेक्षा यावर अवलंबून असते. याच्याच  जोडीला प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची प्रतिमा कशी आहे. हे समजून  घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या जाणीवेचा शरीरातील प्रत्येक  क्रियांवर निश्चितपन परिणाम होत असतो. उदाहरणच घायचे झाले  तर विशिष्ट डॉक्टरांकडून औषध घेतल्याशिवाय काही रुग्णांना बरेच  वाटत नाही. त्यांचे समाधान होत नाही. याचे कारण त्या रुग्णाची  त्या डॉक्टरवर असलेली श्रद्धा. ही श्रद्धा व विश्वास डॉक्टरने मिळवणे हे.  औषधोपचारांपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे.

वृद्ध लोकांचा आत्मविश्वास सर्वच बाबतीत कमी व्हायला लागलेला असतो. त्यातच आजार झाले म्हणजे तर ते हतबल होतात. निराश होतात, त्यांच्यावर एक प्रकारचे मानसिक दडपण येते. आणि दडपणाखाली सतत राहिल्यामुळे त्यांचे शरीरही त्यांना आजारास समर्थपणे तोंड देण्यास सहाय्य करत नाही. पर्यायाने आत्मविश्वास गमविलेले आणि सतत मानसिक दडपणाखाली असलेले वृद्ध लवकर हे जग सोडून जातात असे लक्षात आले आहे. थोडक्यात वृद्धपणा, आजारपण हे तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. यामुळे आत्मविश्वास वाढविणे आणि आजाराकडे वृद्धत्वाकडे बघण्यास दृष्टीकोन बदलणे हे सर्वात महत्वाचे आपण म्हातारे होतो आहोत ही जाणीवच आपल्याला अधिक म्हातारे करत असते. आपण फक्त जगत राहण्याचे कर्म करीत राहिलो तर आपण म्हातारे होत आहोत ही जाणीवही होणार नाही. आणि असा दृष्टीकोन ठेवल्यामुळे तुम्ही अधिक जोमात जगू शकाल तुमचे विचार हेच तुम्हाला म्हातारे करत असतात. विचार हि सुद्धा एक उर्जा आहे. तिचा वापर कसा करायचा यावर तुमचे सर्व जीवन अवलंबून असते. शरीरात घडत असणाऱ्या प्रत्येक क्रियांचा तुम्ही विचार करू लागलात. तर त्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते. कुठल्याही एका घटनेकडे, दोन भीत्र व्यक्ती या वेगळ्या तऱ्हेने बघत असतात. त्यांच्या त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. त्याप्रमाणे एकाच गोष्टीचे दोन भित्र व्यक्तींना वेगवेगळे आकलन होऊ शकते. एकच माणूस एकाचा चांगला मित्र असतो. तोच माणूस दुसऱ्याचा शत्रुही असू शकतो. म्हातारपण तुमचा मित्र आहे का शत्रु आहे हे तुम्ही ठरवायचे.

“शिकणे” हा मनाचा केलेला सर्वोत्तम उपयोग होय. तुम्ही कसे शिकता यावर तुमच्या शरीरात बदल होत असतात. शिकणे याचा अर्थ समजून घेणे असा आहे. शरीरातच नव्हे तर जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही कसा अर्थ लावाल त्याप्रमाणे शरीर व मनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो. जीवन जगताना आपण कायम विधार्थी राहील पाहिजे. जीवनाचा अर्थ कळून घेण्यासाठी जो सतत प्रयत्न् करतो तो जीवनाचा विधार्थी म्हणजेच जीवनार्थी होय.
शरीरातील प्रत्येक अवयवाला त्या-त्या शरीराची सवय झालेली असते. म्हणूनच किडनी, ह्दय, यासारख्या अवयवांचे रोपण केले तरी बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीवर रोपण केले आहे ते शरीर तो अवयव नाकारते. हे का होते! दुसरा तसाच अवयव हा त्या शरीराला ‘परकाच’ असतो. ही परकेपणाची भावना शरीराला समजते. आपलं कोन आणि परके कोण हे शरीराला सांगावे लागत नाही.

शरीरातील प्रत्येक पेशी या तुम्हाला येत असलेल्या अनुभवांवर संस्कार करीत असतात आणि तुमचा त्या अनुभवाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावीत असतात. तुम्ही जर दु:खी असाल तर तुमचे शरीरही दु:खी होईल तुम्ही दु:खी झालात म्हणजे त्याप्रमाणे शरीरातील क्रियांना संदेश मिळतात. व त्यानुसार संप्रेरकार्ची निर्मिती होते, मेंदूतील संदेश वाहकावर विपरीत परिणाम होतो. पचनशएक्क्तीवर विपरीत परिणाम होतो. झोप नीट लागत नाही.
त्याचप्रमाणे तुम्ही म्हातारे झाले आहात असे समजू लागलाच म्हणजे शरीरात पण त्याप्रमाणेच, क्रिया घडू लागतात. म्हातारपण हा नैसर्गिकरित्या होणारा शारीरिक बदल असला तरी त्याची आम्हांला जाणीव होण्यामुळेच आम्ही म्हातारे होतो. जोपर्यंत नवीन नवीन गोष्टींचे ज्ञान तुम्हाला घेता येत आहे तोपर्यंत तुम्ही तरुणच आहात. नवीन ज्ञान प्राप्त करण्याच्या वृतीमुळे नवीन कौशल्य व कला शिकण्याच्या इच्छेमुळे तुम्हाला जगाकडे बघण्याची एक नवीन दिशा म्हातारपणी प्राप्त होते. त्यामुळे तुमचे शरीर व मन सतत विकसित होत असते. ही विकसित होण्याची क्रिया तुम्ही म्हातारे झालात म्हणून थांबत नसते. प्रत्येक क्षण हा नित्य नवीन असतो. तोच खरा निसर्ग आहे. हा बदल अपरिहार्य आहे आणि या बदलाप्रमाणे तुम्ही जगलात, त्याची जाणीव ठेवलीत तर तुम्ही म्हातारे झाला नसून तुमच्या शरीरात वाढत्या वयाप्रमाणे नैसर्गिक बदल झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल …….

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu