Sabudana Khichdi is a popular and excellent Maharashtrian breakfast dish of Khichdi are Mixed Vegetable Khichdi, Moong Dal Khichdi
साहित्य- दोन वाट्या साबुदाणा, पाव वाटी मुगाची डाळ, दोन कांदे, पाच हिरव्या मिरच्याचार चमचे लिंबू रस, अर्धी वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, चवी नुसार मीठ, थोडी साखर, तेल .
कृती -: साबुदाणा तीन तास भिजत ठेवावा. मुगाची डाळ दोन तास भिजत ठेवावी व नंतर वाटून घ्यावी. तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी. त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरच्या परतून घ्याव्या. त्यावर वाटलेली डाळ मीठ घालावे आणि जरा वेळ परतावे. नंतर त्यात साबुदाणा घालावा. नंतर नीट ढवळून झाकण ठेवून वाफ येवू द्यावी. चवी साठी थोडी साखर व लिंबाचा रस घालावा. डाळ चांगली मोकळी झाल्यावर उतरावे. कोथिंबीर खोबरे घालून हा उपमा सर्व्ह करावा.