Mix bhaji gole Pulao :
This is an Easy Recipe for Mix bhaji gole Pulao. It has various veg in one recipe. This is the first time I had such a wonderful mix veg pulao. It’ s taste is awesome. If you prepare this recipe then you just love it.
साहित्य:– दोन वाट्या बासमती तांदूळ, अर्धी वाटी तूप, प्रत्येकी एक चमचा काजू, बादाम, बेदाणा. ४ लवंगा, आठ काळी मिरी, २ दालचिनी, मसालावेलची २, तमाल पत्र २, मीठ, लिंबाचा रस २ चमचे. एक चमचा गोडां मसाला.
गोळ्यांसाठी भाजी, साहित्य-: एक वाटी बारीक किसलेली कोबी, एक वाटी किसलेला गाजर, एक वाटी उकडलेला किसलेला बटाटा, एक वाटी जाडसर वाटलेले हिरवे मटार, एक चमचा आले लसून पेष्ट, एक चमचा गोडां मसाला, चवी नुसार मीठ, अर्धा कप डाळीचे पीठ, दोन चमचे लिंबाच रस, हिरव्या मिरचा तीन बारीक करून, अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून.
कृती -: गोळ्यांसाठी दिलेले सर्व साहित्य एकत्रित करून त्याचे साधारण आवळ्या प्रमाणे गोळे करून तळून ठेवावे. काही गोळ्यांना चांदी वर्ख लावावा, काही असेच ठेवावे. तांदूळ एक तास पूर्वीच धुवून ठेवावेत. अंदाजे पाणी गरम करून ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून प्रथम सर्व ड्राय फ्रुट्स तळून घ्यावे, उरलेल्या तुपात सर्व मसाला घालावा व तुपात परतून शिजू द्यावा नंतर त्यात तांदूळ टाकून परतून घ्यावे, नंतर लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालावा व गरम पाणी सोडून भात मोकळा शिजू द्यावा, नंतर त्यात वर्ख न लावलेले गोळे भातात मिसळावे, व थोडावेळ झाकून ठेवावे, व सर्व्ह करताना वर्ख लावलेले गोळे त्यावर ठेवून सजवावे.