खिमा भरलेल्या सिमला मिरच्या
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Keema Bhari Shimala mirchi

We make mincemeat with many variations, sometimes we add potatoes, sometimes we add peas, sometimes capsicum, sometimes green chillies, sometimes onion, sometimes cauliflower, sometimes bittergourd and so on but this is my favorite because I love the aroma and taste of capsicum.

hqdefaultसाहित्य-: चार सिमला मिरच्या, १/२ किलो खिमा, दोन कांदे, १/२ चमचा दालचिनी पूड, १/२ चमचा मिरे पूड, दोन चमचा टोमाटो सॉस, एक चमचा आले-लसून पेस्ट, दोन चमचे लोणी, दोन चमचे दही, चार पातीचा कांदा, चवी नुसार मीठ.

 कृती-:मिरच्या धुवून घेवून त्याचा देठ अलगद काढून देठा खालील  भागाची चकती काढून त्या आतील बिया वैगरे काढून पोकळ करून ठेवा कापलेली देठा कडील चकती सुद्धा बाजूला काढून ठेवावी नंतर दोन कप पाणी गरम करून किंचित मीठ घालून त्यात त्या मिरच्या किंचित वाफवून चाळणीत काढून घ्या. खिमा स्व्च्छ करुन त्याला आले-लसून पेस्ट लावून घ्या. कांदा व पातीचा कांदा बारीक कापून घ्या.

       एक चमचा लोणी गरम करून त्यात कांदा व खीमा घालून पाच मिनिटे परता. नंतर एका पातेल्यात काढून घ्या. त्यात बारीक चिरलेला पातीचा कांदा, दालचिनी पूड, मिरेपूड, चवी नुसार मीठ घालून हे मिश्रण तयार करावे व त्या मिरच्यां मध्ये भरावे व वरून कापलेली चकती लावावी. नंतर पसरट प्यन मध्ये एक चमचा लोणी गरम करून त्या मिरच्या ठेवाव्या वरून टोमाटो सॉस मिर्च्यांवर ओता वा त्यावर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे. (१५ ते २० मिनिटांत शिजून घ्या.) सर्व्ह करते वेळी त्यावर थोडे दही घालून घ्या. व सर्व्ह करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu