kachoris Dahi Vada :
Kachori Daha Vada is a snack filled with a stuffing and hot and sweet chutneys and topped with peas and sweetened yoghurt. The spices used in this recipe enhance it’s taste and aroma. I just love this delicious recipe.
साहित्य :- दोन वाट्या उडदाची डाळ छिलका काढलेली, चवी पुरते मीठ, दोन चमचे तिखट, सारणासाठी पाव वाटी बेदाणा, काजूचे तुकडे, थोडी चारोळी, ओले खोबरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, गोडे दही, चवी नुसार साखर, मीठ, कोथिंबीर, तूप, जिरे.
कृती :-उडदाची डाळ दळून त्याचे पीठ करावे. त्यात तिखट, मीठ चवी नुसार, नंतर पाणी घालून घट्ट भिजवावे. खोबरे, मिरच्या, मिक्सर मधून काढाव्या, त्यात चवी नुसार मीठ घालावे, त्यात काजूचे तुकडे, चारोळी बेदाणे मिसळून सारण तयार करावे. भिजवलेल्या पिठाचे वाटी नुसार आकार देवून त्यात थोडे सारण भरावे व वाटी बंद करावी आणि कचोरी प्रमाणे आकार द्यावा. व गरम तेलातून तळून काढाव्या. दही थोडे मिक्सर मधून फिरवून घ्यावे, त्यात थोडी साखर चवी नुसार मीठ, कोथिंबीर, टाकावी, नंतर तूप जिरे याची फोडणी करून त्यात घालावी व थोडे दही तांका प्रमाणे व थोडे घट्ट ठेवावे. तळलेले वडे ताकात टाकून हलक्या हाताने थोडे दाबावे, व घट्ट दह्यात टाकावे .