Human mind – (sant kabirdas) depend upon the human mind is the past and future of the waves of the ship . Myself laugh watching it right , do not get pleasure . Only own benefits to consider, says the selfishness.
मानवी मन म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या लाटांवर हिंदकळणारे जहाज आहे. स्वत:पुरते पाहणे यात खरे सुख मिळत नाही. केवळ स्वत:च्या लाभाचा विचार करणे, याला स्वार्थीपणा म्हणतात. दुसर्यांच्या सुख:दुखांचा, भावभावनांचा विचार करणे हा मनाचा मोठेपणा, सुसंस्कृतपणा होय. जर का मनुष्य स्वत:ला मोठा म्हणवत असेल ते त्याच्या मोठेपणाचा लाभ ईतरांना म्हणजे दिन-दुबळ्याना गरजुना होत असेल तर त्या मोठेपणाला फार मुल्य आहे
नाहीतर कबीरदास म्हणतात —
बडा हुवा तो क्या हुवा, जैसे पेड खजूर | पंछी को छाया नही फल लागे अति दूर || या दोह्यात तेच सांगितले आहे -खजुराचे झाड फार उंच असते. त्यामुळे त्याची सावली कुणाला मिळू शकत नाही, आणि फळ फार उंचावर लागल्यामुळे कुणी खावू शकत नाही. तेव्हा या उंच झाडाचा काहीच उपयोग नाही .
मानुष्याजवळ ज्ञान, धन, द्रव्य, सत्ता, अधिकार असेल किंवा दया, क्षमा, शांती, करुणा, भूतदया जर असेल तर त्याचा उपयोग ईतरांना झाला पाहिजे. मनुष्याने स्वत: साठी जगावे असे नाही पण इतरांसाठी झिजावे, कष्ट घ्यावे. हीच खरी माणुसकी याचीच वाढ म्हणजे सुधारणा, ईतरांची मने राखल्यास आपण सुखाला प्राप्त करू शकतो. दुषित भावनेच्या जाळ्यातून माणसाने स्वत:ला मुक्त केले पाहिजे. हाच एक मानवास तरणोपाय आहे. आजच्या या वेळी मनस्वास्थ्य कुणाजवळहि उरलेले नाही. हा भौतिकवादाचा लखलखाट एवढा पॉवरवान आहे कि त्याच्यातच सर्व दिपून गेलेले आहे. विषारी वासनायुक्त जीवन जगण्यात स्वत:लां कृतकृत मानत आहेत. याचा परिणाम म्हणजे अध्यात्म लोप पावत आहे. परमार्थाकडे कुणाचेच लक्ष नाही. परंतु या भयानक विकारातून सुटका करण्याची गरज आहे. मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असला तरी तो कर्ता नाही. मानवी मनाच्या क्षुद्रपणाने जगात दु:खे अनंत पटीने वाढलेली आहेत. मनुष्याच्या स्वार्थी हेकेखोरपणाने विषमतेची भयंकर वाढ झाले ली आहे.
इंद्रियांचे भोग हे क्षणभंगुर असून माणसाला विनाशा कडे नेत आहेत. हि आसक्ती मनुष्याने काढून टाकायला हवी. आपल्या या बहुमूल्य जीवनाशी प्राकृतिक चिकित्सा, योग चिकित्सा हि जोडायला हवी. कारण प्रकृतीत जे कार्यकारण नियम आहेत त्यानुसार जीवन असतं, शरीरातच रोग मुक्तीची क्रिया दडलेली असते, त्या प्राकृतिक नियमांना नाकारून चालणार नाही.नियम पाळणे यातच बुद्धिमत्ता आहे. या बहुमुल्य जीवनाची किंमत धन, ऐश्वर्य याही पेक्षा अधिक आहे. या बहुमूल्य जीवनाला सुंदर,प्रसंन्न बनविणे हे प्राकृतिकचिकित्सा,व योगचिकित्सा याला स्वीकारून स्वास्थ्य मिळवावे लागेल. आज सर्वत्र पाप वाढून पुण्य कमी होत आहे.
माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे.त्याची मुल्ये जोपासली पाहिजे.सौजन्य,सौहाद्र्य आणि सहिष्णुता हाच मानुष्याचा स्वभाव बनावा. दुसर्याला मदत करण्याचे धोरण सदा असावे. आशावादी असावे. आपले आचार, विचार, आपल्या अवती भवतीची परिस्थिती सदा बदलत असणे म्हणजेच जीवनाची दिशा बदलत असते. विचार हि स्मृतीची प्रक्रिया आहे. मुक्त-रिक्त मन म्हणजे शुद्ध चेतन शक्ती, ती ध्यानातून साध्य होते.
मागील-पुढील जन्माची अखंड परंपरा व पुन्हा-पुन्हा येणार्या अस्तित्वाचे चक्र म्हणजे संसार, हीच आपली कर्मे आपल्याला पुन्हा-पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात. कोणी कितीही उच्च कोटीचा महात्मा,किंवा सत्पुरुष असेल तरी त्यालाही दु:ख अटळ असतो, प्रयेक प्रकारच्या संवेदन चा उपयोग आपण पूर्व संस्कार दूर करण्या चे साधन म्हणून केला पाहिजे. निसर्गनियमानुसार आपण जगायला शिकल्यास आपले आयुष्य विकाररहित,सुंदर व सुरेख बनू शकते. विकार हे आपल्या दैनंदिन चुकांचे फळ असते आणि या चुका वारंवार होत गेल्या तर त्या महाअपराध असतात. म्हणून विचित्र विकारांच्या स्वरूपात निसर्ग आपणास शिक्षा देतो. त्याकरिता मनातून खिन्नता, उद्विग्नता, नैराश काढून टाकले व आशावादी भावना ठेवली तर यातून सुटका होऊ शकते. प्रार्थना, श्रद्धा, विश्वास यातूनच मनुष्याला बळ मिळत असते.
आज भरकटलेल्या मनुष्याला नैतिक अधिष्ठानाची नितांत गरज आहे. चित्तात अध्यात्माची निष्ठा,व्यवहारात सौहार्द्य पण हे सर्व उत्तम विचार मनुष्याला एकांतात सुचतात,तेव्हा त्याच्यासाठी एकांतासारखा खरा सोबती दुसरा कोणी नाही.